शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
6
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
7
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
8
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
9
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
10
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
11
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
12
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
13
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
14
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
15
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
16
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
17
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
18
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
19
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
20
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
Daily Top 2Weekly Top 5

वीजबिल कमी करण्याच्या बहाण्याने फसवणाऱ्या भामट्यांपासून सावधान!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2021 21:19 IST

electricity bill : वीजबिल भरणा व तक्रारींबाबत महावितरण बाह्य कोणत्याही व्यक्ती अथवा घटकांवर विश्वास ठेऊ नये, असे आवाहन मंगळवारी महावितरणकडून प्रसिद्धीपत्रकाद्वारे करण्यात आले आहे.

ठळक मुद्देजागरूक वीज ग्राहक व महावितरणच्या सतर्क यंत्रणेमुळे गेल्या आठवड्यात शहापूर तालुक्यातील आसनगाव येथे फसवणुकीच्या तयारीत असलेल्या एका भामट्याला पकडून पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.

डोंबिवली: वीजबिल कमी करण्याची बतावणी करून वीज ग्राहकांची फसवणूक होत असल्याच्या तक्रारी महावितरणकडे येत आहेत. या पार्श्वभूमीवर महावितरणच्या वीजबिलाच्या कोणत्याही तक्रारींसाठी महावितरणचे आपल्या कार्यक्षेत्रातील कार्यालय अथवा संकेतस्थळ, मोबाइल अँप या डिजिटल माध्यमांचा वापर करावा. वीजबिलाचा भरणा डिजिटल माध्यमातून किंवा महावितरणच्या अधिकृत वीज बिल भरणा केंद्रातच करावा व त्यांच्याकडून छापील भरणा पावती घ्यावी. वीजबिल भरणा व तक्रारींबाबत महावितरण बाह्य कोणत्याही व्यक्ती अथवा घटकांवर विश्वास ठेऊ नये, असे आवाहन मंगळवारी महावितरणकडून प्रसिद्धीपत्रकाद्वारे करण्यात आले आहे. 

जागरूक वीज ग्राहक व महावितरणच्या सतर्क यंत्रणेमुळे गेल्या आठवड्यात शहापूर तालुक्यातील आसनगाव येथे फसवणुकीच्या तयारीत असलेल्या एका भामट्याला पकडून पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. यांदर्भात उपकार्यकारी अभियंता अविनाश कटकवार यांच्या फिर्यादीवरुन अरुण कृष्णा शेळके (रा. नारायणगाव, ता. शहापूर) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून शहापूर पोलिसांनी त्याला अटक केली. पोलीस तपासातून त्याचे साथीदार व फसवणुकीचे प्रकार उघड होत आहेत. यापूर्वी काही उपविभागातही फसवणुकीचे प्रकार उघडकीस आले आहेत. 

वीजबिलाच्या तक्रारीसाठी महावितरणचे संबंधित कार्यालय तसेच संकेतस्थळवरी, ग्राहकांसाठीचे मोबाईल अँप या सुविधा उपलब्ध आहेत. तसेच वीजबिल भरणा करण्यासाठी अधिकृत बिल भरणा केंद्र, संकेतस्थळ, मोबाईल अँप, विविध पेमेंट अँप्स आदी डिजिटल सुविधा उपलब्ध आहेत. वीज ग्राहकांनी या सुविधांच्या माध्यमातूनच तक्रारी व बिल भरणा करावा. बाहेरील व्यक्ती अथवा घटकाच्या आमिषाला बळी पडून फसवणूक झाल्यास त्याला महावितरण जबाबदार राहणार नाही, याची नोंद घेऊन सावधगिरी बाळगण्याचे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे. 

टॅग्स :dombivaliडोंबिवली