शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

कंत्राट दुसऱ्याला दिल्याच्या रागातून कंपनी मॅनेजरवर प्राणघातक हल्ला; मास्टरमाईंडसह अन्य तिघांना अटक

By प्रशांत माने | Updated: March 5, 2023 13:37 IST

फर्निचरच्या कामाचे कंत्राट दुस-याला दिल्याच्या रागातून एकाने इतरांच्या मदतीने कंपनीच्या मॅनेजरवर प्राणघातक हल्ला केल्याची घटना येथील एमआयडीसी, म्हात्रेनगर परिसरात फेब्रुवारी महिन्यात घडली होती.

डोंबिवली:  फर्निचरच्या कामाचे कंत्राट दुस-याला दिल्याच्या रागातून एकाने इतरांच्या मदतीने कंपनीच्या मॅनेजरवर प्राणघातक हल्ला केल्याची घटना येथील एमआयडीसी, म्हात्रेनगर परिसरात फेब्रुवारी महिन्यात घडली होती. या प्रकरणी कल्याण गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलिसांनी सीसीटिव्ही आणि तांत्रिक तपासाच्या आधारे हल्ल्याप्रकरणातील मास्टरमाईंडसह त्याच्या तीन साथीदारांना अटक केली आहे. मुख्य आरोपी पंकज पाटील, शैलेश राठोड, सुशांत जाधव आणि महेश कांबळे अशी आरोपींची नावे आहेत.

सुरेंद्र मौर्या हे एमआयडीसीमधील एका कंपनीत मॅनेजर आहेत. ते १५ फेब्रुवारीला संध्याकाळी कंपनीतून सुटल्यावर दुचाकीने घरी जात होते. त्यांची गाडी म्हात्रेनगर परिसरात आली असता अचानक पाठिमागून आलेल्या दोघा अनोळखी व्यक्तिंनी त्यांची दुचाकी थांबवत त्यांच्यावर लोखंडी रॉडने हल्ला केला. मौर्या यांना जखमी करून हल्लेखोर घटनास्थळावरून पसार झाले. याप्रकरणी मानपाडा पोलिस ठाण्यात मौर्या यांच्या तक्रारीवरून गुन्हा नोंद झाला होता.

या गुन्हयाचा समांतर तपास कल्याण गुन्हे अन्वेषण विभाग देखील करीत होते. वरीष्ठ पोलिस निरिक्षक किशोर शिरसाठ यांच्या मार्गदर्शनाखाली  पोलिस उपनिरिक्षक मोहन कळमकर, सहाय्यक पोलिस उपनिरिक्षक संजय माळी, पोलिस हवालदार विश्वास माने, प्रशांत वानखेडे, अनुप कामत, बापुराव जाधव, बालाजी शिंदे, प्रकाश इदे, विलास कडु, किशोर पाटील, पोलिस नाईक सचिन वानखेडे, गुरूनाथ जरग, मिथुन राठोड, अमोल बोरकर आदिंचे पथक तपास करीत होते. दरम्यान पोलिस हवालदार विश्वास माने आणि पोलिस नाईक गुरूनाथ जरग यांना गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या माहीतीनुसार हल्लाप्रकरणातील चौघांना सोनारपाडा येथे सापळा लावून अटक केली.हल्लेखोरांवर लुटमार, मारहाणीचे गुन्हे

चौघा आरोपींविरोधात लुटमारी, दरोडयाची पूर्वतयारी, विनयभंग, मारहाण असे गुन्हे दाखल आहेत. पंकजवर तीन, सुशांतवर पाच,  शैलेश विरोधात चार तर महेश विरोधात दोन गुन्हे दाखल आहेत. नारपोली, मानपाडा, कोळसेवाडी, धारावी, नागपाडा पोलिस ठाण्यात हे गुन्हे दाखल आहेत. आरोपी पंकजला फर्निचरचे कंत्राट मिळाले होते. परंतू त्याचे कंत्राट कमी करून ते इतर कंत्राटदाराला दिले या रागातून पंकज आणि शैलेश यांच्या सांगण्यावरून सुशांत आणि महेशने मौर्या यांच्यावर हल्ला केल्याची माहीती चौकशीत समोर आल्याची माहीती वरीष्ठ पोलिस निरिक्षक किशोर शिरसाठ यांनी दिली.