शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

 दारूच्या पार्टीत वाद; दगडाने प्रहार करून हत्या, तिघांपैकी दोघांना अटक 

By प्रशांत माने | Updated: November 28, 2023 18:35 IST

दारूच्या पार्टीत किरकोळ कारणावरून झालेल्या वादात तिघांनी एकाची दगडाने प्रहार करून हत्या केल्याचे तपासात समोर आले आहे.

डोंबिवली : पश्चिमेकडील सत्यवान चौक नजीक असलेल्या खाडी किनारी स्मशानभुमीच्या मागे एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह डोक्यावर वार केलेल्या अवस्थेत सोमवारी आढळुन आला होता. दरम्यान या हत्येचे गुढ २४ तासाच्या आत उलगडण्यात विष्णुनगर पोलिसांना यश आले आहे. दारूच्या पार्टीत किरकोळ कारणावरून झालेल्या वादात तिघांनी एकाची दगडाने प्रहार करून हत्या केल्याचे तपासात समोर आले आहे. तिघांपैकी दोघांना अटक करण्यात आली आहे. सोमनाथ शिंदे (वय ४४ ) असे मृत व्यक्तीचे नाव असून हाताला मिळेल ते काम करणारे सोमनाथ हे महात्मा फुलेनगर येथे वास्तव्यास होते. कधी बिगारीचे तर कधी रिक्षा चालविण्याचे काम करणा-या सोमनाथची रिक्षा चालविणा-या योगेश डोंगरे (वय ४३), विलन टावरे ( वय ४१) आणि दिपक करकडे अशा तिघांची ओळख होती. त्यांच्यात अधूनमधून दारूपार्टी देखील व्हायची. शनिवारी रात्री दहा वाजता त्यांच्यात दारूपार्टी झाली. यावेळी त्यांच्यात किरकोळ कारणावरून वाद झाला. सर्वजण खाडीकिनारी गेले आणि यातील तिघांनी सोमनाथच्या डोक्यावर दगडाने प्रहार करून त्याला गंभीर जखमी केले आणि तेथून तिघे निघून गेले. 

जखमी अवस्थेतील सोमनाथचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान या गुन्हयाच्या तपासकामी सहाय्यक पोलिस आयुक्त सुनिल कुराडे आणि वरीष्ठ पोलिस निरिक्षक मोहन खांदारे यांच्या मार्गदर्शनाखाली मृत व्यक्तिची ओळख पटविणे, सीसीटिव्ही फुटेज व इतर तांत्रिक तपास करणे, गुप्त बातमीदारामार्फत माहीती मिळविणे, आजुबाजुच्या पोलिस ठाण्याच्या मिसींग तक्रार दाखल आहे का? आदिंचा शोध घेणेकामी पोलिस उपनिरिक्षक दिपविजय भवर, सहाय्यक पोलिस उपनिरिक्षक रूषीकेश सपकाळ, पोलिस हवालदार मनसब पठाण, हवालदार शकील जमादार, राजेंद्र पाटणकर, राजेश पाटील, नितीन भोसले, निसार पिंजारी, प्रशांत दिवटे, पोलिस शिपाई शशिकांत रायसिंग यांची विशेष पथके नेमण्यात आली होती. दरम्यान तीन आरोपींपैकी दोघांना अटक करण्यात आली आहे. योगेश डोंगरे आणि विलन टावरे अशी अटक आरोपींची नावे आहेत तर दिपक करकडे या आरोपीचा शोध चालू आहे. अटक आरोपींना बुधवारी कल्याण जिल्हा सत्र न्यायालयात हजर केले जाणार आहे. 

टॅग्स :dombivaliडोंबिवलीArrestअटक