शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
2
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
4
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
5
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
6
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
7
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
8
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
9
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
10
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
11
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
12
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
13
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
14
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
15
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
16
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
17
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
18
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
19
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
20
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
Daily Top 2Weekly Top 5

२७ गावातील दसपट मालमत्ता कर आकारणी आणि बेकायदा बांधकाम प्रकरणी फेरमूल्यांकन समिती लवकर नेमा

By मुरलीधर भवार | Updated: June 22, 2023 15:22 IST

सर्व पक्षीय संघर्ष समितीने घेतली आयुक्तांची भेट

मुरलीधर भवार, कल्याण: कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीतील २७ गावातील नागरीकांना १० पट जास्तीचा मालमत्ता कर आकारणी आणि बेकायदा बांधकाम प्रकरणी फेरमूल्यांकन समिती गठीत करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी मागच्या महिन्यात दिले हाेते. या आदेशानुसार समिती लवकर गठीत करुन त्याचा अहवाल महापालिका आयुक्तांनी लवकर राज्य सरकारला सादर करावा अशी मागणी २७ गाव सर्व पक्षीय संघर्ष समितीने केली आहे.

यासंदर्भात संघर्ष समितीचे अध्यक्ष गंगाराम शेलार, उपाध्यक्ष गुलाब वझे, पदाधिकारी चंद्रकांत पाटील, गजानन मांगरुळकर, विश्वानाथ रसाळ, विजय भाने, भास्कर पाटील, दत्ता वझे, जालिंदर पाटील, बाळाराम ठाकूर, दशरथ चिकणकर आदींनी आज महापालिका आयुक्त भाऊसाहेब दांगडे यांची भेट घेतली.

महाालिकेकडून २७ गावातील मालमत्ताधारकांना दहा पटीने कर आकारणी केली जाते. तसेच बेकायदा बांधकामे नियमित करण्याची मागणी संघर्ष समितीने केली होती. २ मे रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दालनात यासंदर्भात बैठक पार पडली. या बैठकीत फेरमूल्यांकन करण्यासाठी समिती नेण्याचे आदेश आयुक्तांना देण्यात आले होते. ही समिती लवकर गठीत केली जावी यासाठी संघर्ष समितीने आज पुन्हा एकदा आग्रही भूमिका मांडली.२०१५ साली तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कल्याण डोंबिवलीतील २७ गावामधील १० गावात कल्याण ग्रोथ सेंटर उभारण्याची घोषणा केली.

१०८९ हेक्टर जागेवर हे ग्रोथ सेंटर उभे राहणार आहे. त्यासाठी १ हजार कोटी ८९ लाखाचा निधी मंजूर आहे. सरकारने १० गावाकरीता एमएमआरडीएचे नियोजन प्राधिकरण ठेवले आहे. मात्र ग्रोथ सेंटरच्या नावाखाली बड्या गृहसंकुलाच्या प्रकल्पानांना मंजूरी दिली जात आहे. याशिवाय शेतकऱ््यांच्या जमीनीही घेतल्या जात आहेत. २७ गावे महापालिका हद्दीत असल्याने ग्रोथ सेंटरची १० गावांचे नियोजन प्राधिकरण हे महापालिकेकडेच असावी अशी मागणी संघर्ष समितीने केली असून ग्रोथ सेंटरचा शेतकरी आणि भूमीपूत्रांना फायदा होत नसेल तर ग्रोथ सेंटर रद्द करण्यात यावे अशी भूमिका संघर्ष समितीने घेतली आहे. यावर आयुक्तांनी प्रशासन समितीच्या मागण्यावर सकारात्मक विचार करणार आहे. लवकरच समिती नेमणार आहे असे स्पष्ट केले आहे.

नागरीकांच्या तोंडचे पाणी कोण चोरते ?

भाेपर, पिसवली, आडीवली ढोकळी आदी गावांमधील नागरीकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागतो. २७ गावांकरीता १०५ दश लक्ष लीटर पाणी कोटाच मंजूर आहे. प्रत्यक्षात २७ गावांना एमआयडीसीकडून केवळ ५५ दश लक्ष लिटर पाणी मिळते. त्यातही आत्ता पाणी कपात सुरु आहे. त्यामुळे नागरीकांच्या तोंडचे पाणी कोण चोरी करीत आहे असा सवाल संघर्ष समितीने उपस्थित केला आहे.

 

टॅग्स :kalyanकल्याण