शहरं
Join us  
Trending Stories
1
२ अभियंत्यांना वाचवण्यासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाने घेतला २ निष्पाप प्रवाशांचा बळी
2
आजचे राशीभविष्य,०७ नोव्हेंबर २०२५: नवे कार्य हाती घेऊ नका; मतभेद होणार नाहीत याची दक्षता घ्यावी
3
अजित पवारांचे पुत्र पार्थ यांचा जमीन घोटाळा; ३०० कोटींत खरेदी केली १८०० कोटींची जमीन
4
शिंदेसेनेला अंगावर घेणारे भाजपाचे आमदार संजय केळकर निवडणूक प्रमुख; महायुतीची शक्यता दुरावली
5
ठाणे, दिवा अन् कल्याणमध्येही प्रवाशांचे प्रचंड हाल; लोकल कर्जतकडे वळवल्याने प्रवासी संतप्त
6
शिंदेसेना-भाजपचे परस्परांना युती तोडून टाकण्याचे आव्हान; दोन्ही गटांची एकमेकांवर टीकास्त्र
7
मेट्रोची भाडेवाढ? समितीसाठी केंद्राकडे प्रस्ताव; अंधेरी, दहिसर मेट्रो भाडे वाढण्याची शक्यता
8
येत्या ११ नोव्हेंबरला प्रभागात कोणाची लागणार लॉटरी? मुंबईकरांसह सर्वपक्षीय नगरसेवकांचे लक्ष
9
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
10
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
11
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
12
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
13
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
14
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
15
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
16
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
17
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
18
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
19
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
20
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...

शिवमंदिराच्या अंगणात मैथिलीच्या निरागस सुरांचा अभिषेक! 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2023 09:10 IST

शिवमंदिर आर्ट फेस्टिव्हलमध्ये रविवारची पहाट सुप्रसिद्ध गायिका मैथिली ठाकुर हिच्या निरागस सुरांनी मंगलमय झाली.

मयुरी चव्हाण-काकडे, लोकमत न्यूज नेटवर्क,  कल्याण: शिवमंदिर आर्ट फेस्टिव्हलमध्ये रविवारची पहाट सुप्रसिद्ध गायिका मैथिली ठाकुर ( Maithili Thakur ) हिच्या निरागस सुरांनी मंगलमय झाली. अंबरनाथच्या प्राचीन शिवमंदिरात मैथिलीने आपल्या निरागस सुरांनी जणू काही शिव शंकराला स्वराभिषेकच केला. मैथिलीचे सादरीकरण ‘याचि डोळा याचि देही’ अनुभवण्यासाठी अंबरनाथ-उल्हासनगर परिसरातील रसिकांनी हाऊसफुल्ल गर्दी केली होती.

भारतरत्न पं.भीमसेन जोशी यांनी अजरामर केलेल्या अभंगवाणीतील ‘माझे माहेर पंढरी’ या अभंगाने तिने तिच्या भक्तीगीतांच्या मैफलीचा श्रीगणेशा केला. त्यानंतर ‘डिमिक डिमिक डमरू कर बाजे’,  ‘शंकर तेरी जटा में बहती है गंगधारा’, ‘कैलास के निवासी’ अशी शिव शंकराची भजने तिने गायली. भोजपुरी भाषेतील ‘आज मिथिला नगरिया नेहाल सखियॉ’ हे भोजपुरी भाषेतील राम भजनाबरोबरच ‘तोडा है धनुष्य सीता से नाता जोडा है’, ‘नगरी आयोध्यासी’, ‘सजादो घरको गुलशनसा अवध में राम आये है’, ‘श्रीराम जानकी बैठे है मेरे सीने में’, राम सिया राम सिया राम जय जय राम !  अशी श्रीरामाची गीते तिने सादर केली.

त्याचबरोबर रसिकांकडून आलेली कृष्णगीतांची फर्माईश पूर्ण करण्यासाठी तिने ‘वृंदावन में जाने को जी चाहता है, राधे राधे को गाने को जी चाहता है’  गाणे गायले. ‘अबीर गुलाल उधळीत रंग’, ‘कानडा राजा पंढरीचा, 'मनी नाही भाव आणि देवा मला पाव '   ही मराठी भजनेही तिने सादर केली.

महिषासूर मर्दिनी आणि शिवतांडव स्तोत्र, ‘दमादम मस्त कलंदर’  अशी फर्माईशीनुसार विविध शैलीची गाणी गात तिने श्रोत्यांना दोन तास मंत्रमुग्ध केले. 'भारत का बच्चा बच्चा जय जय श्रीराम बोलेगा' या गाण्यावर उपस्थित रसिकांनी ताल धरला. भक्तीगीतांच्या या मैफलीदरम्यान तिने सहजपणे श्रोत्यांशी संवादही साधला.अंबरनाथमध्ये प्राचीन शिवमंदिराच्या प्रांगणात भक्तीगीतांची मैफल सादर करण्याची संधी दिल्याबद्दल मैथिली ठाकुरने यावेळी डॉ. श्रीकांत शिंदे फाऊंडेशनचे आभार मानले. तर पुन्हा एकदा अंबरनाथ मध्ये कार्यक्रम सादर करायला आवडेल असेही तिने आवर्जून नमूद केले.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :kdmcकल्याण डोंबिवली महापालिका