शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

कल्याणच्या किल्ले दुर्गाडीच्या जागेवर दावा सांगण्याचा प्रयत्न

By मुरलीधर भवार | Updated: November 3, 2023 16:23 IST

माळशेज घाट वनक्षेत्र आणि पर्यटन स्थळ विकास समितीचे अध्यक्ष शिर्के सातवाहन याने कल्याण तहसील कार्यालयाकडे अर्ज केला होता.

कल्याण-किल्ले दुर्गाडीच्या जागेवर नाव लावण्याचा प्रयत्न करणाऱ््याच्या विरोधात कल्याणच्या महात्मा फुले पोलिस ठाण्यात फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुयश शिर्के सातवाहन असे या व्यक्तीचेने नाव आहे. तो माळशेज घाट वनक्षेत्र आणि पर्यटनस्थळ विकास समितीचे अध्यक्ष असल्याचे त्याने म्हटले हाेते. त्याने किल्ले दुर्गाडीच्या जागेवर नाव लावण्यासाठी अर्ज केला होता. मात्र त्यासाठी सबळ कागदपत्रे सादर केली नसल्याचे उघड झाले आहे.कल्याणमधील किल्ले दुर्गाडी हा स्थान शिवकालीन आहे. किल्ले दुर्गाडी हा ठाणे जिल्हाधिकारी यांच्या अखत्यारीत आहे.

माळशेज घाट वनक्षेत्र आणि पर्यटन स्थळ विकास समितीचे अध्यक्ष शिर्के सातवाहन याने कल्याण तहसील कार्यालयाकडे अर्ज केला होता. या अर्जानुसार त्याने एका जमिनीच्या उताऱ्यावर ना हरकत दाखल मागितला होता. हा अर्ज जिल्हाधिकारी ठाणे कार्यालयाकडे चौकशीकरीता गेला. त्याठिकाणाहून चौकशी होऊन तो कल्याण तहसील कार्यालयास प्राप्त झाला. कल्याण तहसील कार्यालयातील मंडळ अधिकारी प्रिती गुडे यांनी या प्रकरणी महात्मा फुले पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे की, ज्या जागेसंदर्भात शिर्के सातवाहन याने नाव लावण्याकरीता अर्ज केला होता. त्याठिकाणी किल्ले दुर्गाडी आहे. किल्ले दुर्गाडीच्या जागेवर दावा सांगणाऱ्या शिर्के सातवाहन याने सादर केलेली कागदपत्रे ही साक्षांकीत आणि नोंदणीकृत नसल्याचे दिसून आले.

अधिकची तपासणी आणि छाननी केली असता शिर्केची कागदपत्रे ही संशयास्पद, बनावट आणि बोगस असल्याचे दिसून आले असे मंडळ अधिकारी गुडे यांनी म्हटले आहे. तसा अहवालच गुडे यांनी कल्याणचे तहसीलदार जयराज देशमुख यांना सादर केल्यावर देशमुख यांच्या आदेशानुसार गुडे यांनी महात्मा फुले पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. पोलिसांनी या प्रकरणी शिर्के याच्या विरोधात फसवणूकीचा गुन्हा दाखल केला आहे. या संदर्भात तहसीलदार देशमुख यांनी सांगितले की, संबंधित व्यक्तीने दुर्गाडीच्या जागेवर नाव लावण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र त्याचे पुरावे त्याने सादर केलेले नव्हते.