शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
7
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
8
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
9
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
10
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
11
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
12
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
13
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
14
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
15
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
16
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
17
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
18
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
19
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
20
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
Daily Top 2Weekly Top 5

केडीएमसी आयुक्तांच्या इशाऱ्यानंतर खड्डे भरण्याच्या कामाला सुरुवात

By मुरलीधर भवार | Updated: August 27, 2022 19:20 IST

माजी शिवसेना नगरसेवकांसोबत आयुक्तांनी घेतलेल्या बैठकीत सदस्यांनी खडडे तातडीने बुजविण्याची मागणी केली होती.

मुरलीधर भवार

कल्याण-गणपती आगमनापूर्वी कल्याण डोंबिवलीतील रस्त्यावरील खड्डे बुजवा असे आदेश आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे यांनी अधिकाऱ्यांना दिले होते. मात्र कंत्राटदाराकडून काम केले जात नसल्याने काल स्वत: आयुक्तांनी रस्त्यावर उतरून खड्डे बुजविण्याची पाहणी केली. तसेच खड्डे बुजविले नाही तर कंत्राटदाराना काळ्य़ा यादीत टाकण्याची तंबी दिली. त्या पश्चात आजपासून शहरातील रस्त्यावरील खड्डे भरण्याच्या कामाला गती मिळाली आहे.

शहर अभियंत्या सपना कोळी देवनपल्ली आणि कार्यकारी अभियंता जगदीश कोरे यांनी शहरातील रस्त्यावरील खड्डे बुजविण्याच्या कामाला गती दिली आहे. कल्याण मधील ब प्रभागातील टावरी पाडा, रामबाग लेन नंबर चार, बारावे रोड, भोईरवाडी, जे प्रभागातील लोकग्राम, नव्वद फुटी रोड, क प्रभागातील दुर्गाडी गोविंदवाडी बायपास रस्ता ,नानासाहेब धर्माधिकारी रोड या रस्त्यावरील खड्डे भरणो व डांबरीकरणाची कामे करण्यात आली तर डोंबिवलीमध्ये गरीबाचा वाडा रोड ,जोंधळे हायस्कूल रोड , मंजूनाथ शाळेसमोरील रस्ता, जैन मंदिर रोड दत्तनगर, नांदिवली रोड , नेरूरकर रोड, टिळक रोड, टिळक चौक , लोढा कासाबेला गणेश घाट रोड, रेतीबंदर रोड ,वरील खड्डे डांबरीकरणाने भरण्यात आले . ई प्रभाग व आय प्रभाग येथे खडीकरणाने रस्ते दूरूस्ती करण्यात आली आहे. पालिकेच्या इतर परिसरातही खड्डे भरणे आणि डांबरीकरणाचे काम यापुढेही सातत्याने चालू राहणार आहे अशी माहिती शहर अभियंता कोळी देवनपल्ली यांनी दिली.

दरम्यान यासंदर्भात माजी शिवसेना नगरसेवकांसोबत आयुक्तांनी घेतलेल्या बैठकीत सदस्यांनी खडडे तातडीने बुजविण्याची मागणी केली होती. कामाला सुरुवात नसून खड्डे भरले जात नसल्याच्या मुद्याकडे शिवसेनेचे माजी नगरसेवक मोहन उगले यांनी खड्डे भरण्याच्या कामाला सुरुवात नाही केली तर आयुक्तांच्या दालनासमोर चिखल फेको आंदोलन केले जाईल असा इशारा प्रशासनाला दिला होता.

टॅग्स :kdmcकल्याण डोंबिवली महापालिका