शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्यातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंविरोधात आदित्य ठाकरे; खासदार राजन विचारेंची माहिती

By अनिकेत घमंडी | Updated: January 13, 2024 18:32 IST

आगामी विधानसभा निवडणुकीत ठाणे विधानसभा मतदारसंघात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या विरोधात आमदार आदित्य ठाकरे हे उमेदवार असतील अशी माहिती खासदार राजन विचारे यांनी दिली.

डोंबिवली : आगामी विधानसभा निवडणुकीत ठाणे विधानसभा मतदारसंघात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या विरोधात आमदार आदित्य ठाकरे हे उमेदवार असतील अशी माहिती खासदार राजन विचारे यांनी दिली. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा डोंबिवलीत दौरा होता, त्यावेळी त्यांनी लोकमतला ही माहिती दिली.

ठाकरे यांनी पश्चिमेला तसेच पूर्वेला पक्षाच्या कार्यलयांना भेट दिली, रोड शो केला, त्यावेळी इंदिरा गांधी चौक ते मानपाडा रस्ता एक दिशा मार्ग अडवला होता. आगामी लोकसभा निवडणुकीत कल्याण लोकसभेमध्ये शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा उमेदवार निश्चितच दिला जाईल, गद्दारांना उत्तर मिळेलच, प्रचंड विरोध आहेच तो मतात उतरेल असा टोला ठाकरे यांनी हाणला. त्या लोकसभेसाठी ठाकरे गटाचे वरूण सरदेसाई हे उमेदवार म्हणून पुढे येणार का?, तर त्यावरही विचारे यांनी नाही सांगत तगडा उमेदवार येणार असे स्पष्ट केले. ठाकरेंनी मानपाडा रस्त्यावरील फुटपाथवर सभा घेत नागरिकांना आवाहन केले, त्यावेळी गद्दारांना गाडा अशी घोषणा देण्यात आली. 

शिवसेनेची मूळ मध्यवर्ती शाखा शिंदे गटाने लाटली असून त्याबद्दल देखील ठाकरे म्हणाले की, हरकत नाही, ज्यांनी शाखा घेतली, शाखा तोडली त्यांचे कंबरडे मोडून काढण्यासाठी सज्ज व्हा. त्यावेळी ठाकरे गटाचे नेते संजय राऊत, युवा नेते वरूण सरदेसाई, खासदार राजन विचारे, महिला जिल्हा संघटक कविता गावंड, सदानंद थरवळ, विवेक खामकर आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते. सध्या शिंदे गटाकडे असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अर्धाकृती पुतळ्याला हार घालायला ठाकरे आले नाहीत, ते घाबरले की काय असा टोला त्या मध्यवर्ती शाखे बाहेर उभे असलेले खासदार श्रीकांत शिंदे यांचे स्वीय सहाय्यक अभिजित दरेकर, शहरप्रमुख राजेश मोरे यांनी लगावला. तसेच मुख्यमंत्री शिंदेंविरोधात आदित्य ठाकरे उमेदवार म्हणून येत असतील तर त्यांना वेलकम आहे अशा शब्दात शिंदे गटाने त्यांचे स्वागत केले.  

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेAditya Thackreyआदित्य ठाकरेPoliticsराजकारण