शहरं
Join us  
Trending Stories
1
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
2
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
3
“सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा”: अजित पवार
4
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
5
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
6
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
7
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
8
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
9
दुकानदाराच्या डोळ्यात मिरची पूड टाकून ५० हजार रुपये लुटले, संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद!
10
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
11
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
12
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
13
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
14
Maharashtra Day 2025 Wishes: महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा द्या 'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून, शेअर करा सुंदर शुभेच्छापत्रं!
15
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
16
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
17
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
18
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
19
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)

४१ लाखांची वीजचोरी उघडकीस, कल्याणमध्ये १३९ वीज चोरांविरुद्ध कारवाई

By अनिकेत घमंडी | Updated: October 17, 2022 16:03 IST

४१ लाखांची वीजचोरी उघडकीस

कल्याण: महावितरणच्या कल्याण पश्चिम विभागातील मोहने वीज वाहीनीवरील वीज चोरांविरुद्ध धडक कारवाई सुरू आहे. गेल्या दीड महिन्यात या वाहिनीवरील १४९ वीज चोरट्यांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला असून ४१ लाख ५७ हजार रुपयांची वीजचोरी उघडकीस आणली आहे. या भागात वीज चोरांविरुद्धची कारवाई निरंतरपणे सुरू राहणार असल्याची माहिती महावितरणने दिली आहे.

मोहने वीजवाहिनी क्रमांक सातद्वारे वडवली, अटाळी, आंबिवली, नवनाथ नगर, संतोषीमाता तसेच आंबिवली स्टेशन या परिसरास वीज पुरवठा केला जातो. कल्याण पश्चिम विभागात या वाहिनीची वीजहानी सर्वाधिक आहे. ही वीजहानी कमी करण्यासाठी उच्चदाब व लघुदाब तारा बदलणे, पोलवरील अतिरिक्त सर्विस वायर काढणे, निकामी मीटर बदलणे आणि वीज चोरांविरुद्ध धडक कारवाई करण्याच्या उपाययोजना सुरू आहेत. गेल्या दीड महिन्यात वीज कायदा २००३ च्या कलम १३५ नुसार १३९ वीज चोरांवर कारवाई करून ४१ लाख ५७ हजार ८७० रुपयांची वीजचोरी उघडकीस आणली असून संबंधितांना चोरीच्या विजेचे देयक देण्यात आले आहे. विहित मुदतीत वीजचोरीच्या देयकाचा भरणा न करणाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल होण्यासाठी पोलिसात फिर्याद देण्यात येईल. घरात मिटरच्या इनकमिंग वायरला जॉईंट असणे, मिटर बायपास करणे, मिटरचे एम-सिल तोडणे, मिटरमध्ये फेरफार करून वीजचोरी करण्यात येत असल्याचे आढळून आले आहे.

कल्याण परिमंडलाचे मुख्य अभियंता धनंजय औंढेकर व कल्याण मंडल एकचे अधीक्षक अभियंता दिपक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यकारी अभियंता दीगंबर राठोड यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई सुरू आहे. वीजचोरी हा गंभीर स्वरुपाचा गुन्हा असून या गुन्ह्यासाठी तीन वर्षांपर्यंत कारावास आणि दंडाच्या शिक्षेची तरतूद आहे. त्यामुळे कोणत्याही प्रकारे विजेचा अनधिकृत वापर कटाक्षाने टाळावा व सुलभ पद्धतीने उपलब्ध असलेली अधिकृत वीजजोडणी घेऊन वीजवापर करावा, असे आवाहन महावितरणने केले आहे.

टॅग्स :kalyanकल्याणelectricityवीज