शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

मालकाने पगार थकविल्याने लाकडाच्या कारखान्यात काम करणाऱ्या कामगाराने घेतला गळफास

By मुरलीधर भवार | Updated: April 22, 2023 19:03 IST

-शहाड नजीक असलेल्या बंदरपाडा येथील लाकडाच्या कारखान्यात काम करणाऱ्या कामगाराने कारखान्यात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आले.

कल्याण-शहाड नजीक असलेल्या बंदरपाडा येथील लाकडाच्या कारखान्यात काम करणाऱ्या कामगाराने कारखान्यात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आले. आत्महत्या करणा:या कामगाराचे नाव कैलास अहिरे असे आहे. त्याने आत्महत्या करण्यापूर्वी लिहून ठेवल्या चिठ्ठीत त्याच्या डोक्यावर कर्ज होते. वखारीचा मालकाने त्याचा १६ महिन्यापासून पगार दिला नव्हता. एकीकडे कर्ज आणि मालकाकडून मिळत नसलेला पगार या विवंचनेतून कामगार कैलास याने आत्महत्या करुन जीवन यात्रा संपविली आहे. या घनटेमुळे परिसरात एकच हळहळ व्यक्त केली जात आहे. 

कैलास हे राहण्यास डोंबिवली अहिरे गावात राहत होते. ते बंदरपाडा येथील लाकडाच्या कारखान्यात कामाला होते. ते कारखान्यातच राहत होते. मात्र ते त्यांच्या कुटुंबियांच्या संपर्कात होते. कैलास यांना त्यांचा मालक पगार देत  नसल्याने घर खर्च भागविण्यासाठी कैलासने काही लोकांकडून उसने पैसे घेतले होते. त्याच्या डोक्यावर कर्ज होते. पगार होत नसल्याने कर्ज कसे फेडायचे या विवंचनेत कैलास होते. पगार होत नसल्याने घरच्यांना काय सांगायचे असा प्रश्न त्याच्या पुढे होते. तो घरी जात नव्हता. तीन महिन्यापासून त्याच्या कारखान्याचा मालक कैलासला पगार देण्याचे आश्वासन देत होता.

मात्र कैलास यांना पगार दिला गेला नाही. कैलास यांचा मुलगा यशवंत याने सांगितले की, वडील घरी येत नव्हते. कारखान्याचा मालक त्याच्या वडिलांकडून काम करुन घेत होता. मात्र घरी सोडत नव्हता. या घटनेची नोंद खडकपाडा पोलिसांनी केली असून पुढील तपास सुरु आहे.