शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

भटक्या श्वानाला डोक्यात दगड घालून ठार मारले!

By प्रशांत माने | Updated: December 20, 2023 16:30 IST

पिसवलीतील धक्कादायक घटना.

डोंबिवली: भटक्या श्वानाच्या डोक्यात दगड घालून त्याला ठार मारल्याची धक्कादायक घटना मानपाडा हद्दीतील पिसवली परिसरात घडली. श्वानाला निर्दयीपणे मारणा-या ओम प्रकाश सिंग याच्या विरोधात मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. 

मलंग रोड पिसवली लगतच्या ५०-५० ढाब्या नजीक असलेल्या नाल्याजवळ बसलेल्या एका मादी जातीच्या भटक्या श्वानाच्या डोक्यात ओमप्रकाशने दोन दगड घालत तीला गंभीर जखमी केले. दगडं डोक्यात घातल्याने श्वान वेदनेने विव्हळत होती. ही संपूर्ण घटना मोबाईल कॅमेरात कैद झाली असून हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यात ओम प्रकाशला आजूबाजूचे नागरिक हे कृत्य करण्यापासून रोखण्याचा प्रयत्न करत होते. मात्र कोणाचेही न ऐकता ओमप्रकाशने मोठे दगड या श्वानाच्या डोक्यात घालून त्याला गंभीर जखमी केले. 

प्राणी मित्रांनी या जखमी श्वानाला उपचारासाठी रुग्णालयात नेले. मात्र  श्वानाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही घटना शनिवारी संध्याकाळी घडली. या घटनेची माहिती सोमवारी कळताच याप्रकरणी अलाईज फॉर ॲनिमल फाउंडेशनच्या सोनाली वाघमारे यांनी तात्काळ मानपाडा पोलीस ठाण्यात धाव घेत श्वानाला निर्दयीपणे मारणा-या ओमप्रकाश विरोधात तक्रार दिली. पोलिसांनी गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरू केला आहे.

टॅग्स :dombivaliडोंबिवली