शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

डोंबिवलीत अतिधोकादायक इमारतीचा भाग कोसळला, तीघेजण अडकले

By प्रशांत माने | Updated: September 15, 2023 21:30 IST

एकाला गंभीर अवस्थेत बाहेर काढले, बचावकार्य सुरू

डोंबिवली: येथील पूर्वेकडील आयरे रोड लक्ष्मणरेषा परिसरातील आदिनारायण भुवन या अतिधोकादायक इमारतीचा भाग शुक्रवारी दुपारी साडेचारच्या सुमारास कोसळला. यात तीघेजण ढिगा-याखाली अडकले. केडीएमसीचे अग्निशमन दल आणि ठाणे आपत्ती प्रतिसाद दल (टीडीआरएफ) यांच्याकडून बचावकार्य सुरू होते. रात्री आठच्या सुमारास तिघांपैकी एकाला गंभीर अवस्थेत बाहेर काढले. उर्वरीत दोघांचा शोध सुरू आहे. लोडबेरींग प्रकारातील इमारत मनपाकडून अतिधोकादायक जाहीर केली गेली होती. विशेष बाब म्हणजे इमारत खाली करताना मनपा अधिकारी कर्मचा-यांच्या पथकासमोरच इमारतीचा भाग कोसळल्याची घटना घडली.

एल टाईप आकाराच्या या तळमजला अधिक तीन मजली इमारतीत प्रत्येक मजल्यावर दहा अशा ४० खोल्या आहेत. इमारत अतिधोकादायक म्हणून जाहीर केल्याने येथील बहुतांश कुटुंबांनी इथली जागा सोडून ते इतरत्र राहायला गेले होते. परंतू पाच ते सहा कुटुंब याठिकाणी वास्तव्याला होती. गुरूवारपासूनच या इमारतीचा काही भाग कोसळत होता. मनपाच्या पथकांना ही माहीती मिळताच तेव्हापासूनच घर रिकामी करण्याबाबत अधिका-यांकडून प्रयत्न सुरू होते परंतू रहिवासी घरातून बाहेर पडायला तयार नव्हते.

शुक्रवारी देखील पथकातले अधिकारी रहिवाशांना जबरदस्तीने बाहेर काढायला आले असता काही कुटुंब घराबाहेर पडली. परंतू दिप्ती लोढीया (वय ४५) आणि अरविंद लोढीया (वय ७०) हे दोघे आजारी तसेच बेडवर उपचार घेत असल्याने ते बाहेर पडू शकले नाही. इमारतीचा तीन मजली भाग कोसळताच त्याखाली हे दोघेच अडकल्याची माहीती मिळाली परंतू खोदकामात अन्य एका अनोळखी व्यक्तिला ढिगा-याखालून बाहेर काढण्यात आले. गंभीर अवस्थेत बाहेर काढलेले दिप्ती लोढीया यांचे पती सुनिल लोढीया असल्याची माहीती उपस्थितांकडून दिली गेली. दरम्यान त्यांना तत्काळ खाजगी रूग्णालयात उपचारार्थ हलविण्यात आले. दरम्यान इतर दोघांचे शोधकार्य सुरू होते.

या घटनेतील गंभीर अवस्थेतील सुनील लोढीया यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे, तर त्यांची पत्नी दिप्ती लोढीया यांना सुखरुप बाहेर काढण्यात आले. त्यांना आता रुग्णालयात हलविण्यात आले आहे, तर ढिगा-याखाली अडकलेल्या अरविंद भाटकर यांचा शोध सुरु आहे.दैव बलवत्तर म्हणून ते बचावले

याच इमारतीलगत एक चाळ आहे. या चाळीतील रहिवाशांना देखील खोल्या रिकाम्या करण्याच्या नोटीसा बजावल्या गेल्या होत्या. इमारतीला लागूनच असलेल्या चाळीच्या खोलीत शोएब मलिक हा तरूण आपल्या दोन मित्रांसह राहत होता. संध्याकाळी साडेचारच्या सुमारास शोएब मित्रांसोबत घराबाहेर पडला आणि अवघ्या काही मिनिटातच ही इमारत कोसळली. पुन्हा तो घराच्या दिशेने परतला असता घरावर कोसळलेल्या इमारतीचा ढिगारा पाहून तो थक्क झाला. शोएब आणि त्याचे मित्र काही मिनिटांपूर्वीच घराबाहेर पडल्याने त्यांचा जीव वाचला.पत्नी आणि मुलगा रूम शोधण्यासाठी घराबाहेर पडले पण...

ढिगा-याखाली अडकलेले ७० वर्षीय अरविंद भाटकर हे आजारी असल्याने घरीच बेडवर झोपले होते तर त्यांची पत्नी आणि मुलगा रूम शोधण्यासाठी घराबाहेर पडले होते. तेवढयात ही इमारत कोसळली. घराबाहेर पडल्याने सुदैवाने दोघांचा जीव वाचला पण अरविंद हे मात्र आजारी असल्याने घराबाहेर पडू शकले नाही.काही अंतरावर असतानाच इमारतीचा भाग कोसळला, अधिकारी बचावले

ग प्रभागाच्या सहाय्यक आयुक्त सोनम देशमुख या सहा ते सात कर्मचा-यांच्या पथकासह इमारत खाली करण्यासाठी गेले होते. त्यांनी इमारतीमधील बहुतांश रहिवाशांना सुखरूप बाहेर काढले. तर भाटकर आणि लोढाया हे आजारी असल्याने ते घराबाहेर पडले नाही. दरम्यान अधिकारी इमारतीबाहेर येऊन काही अंतरावर आले असता इमारत पत्त्यासारखी कोसळली. डोळ्यासमोर घडलेल्या घटनेमुळे अधिकारी वर्ग देखील सुन्न झाला होता. दैव बलवत्तर म्हणून त्यांचेही जीव वाचले.अधिका-यांसह राजकीय मंडळींनी घेतली धाव

मनपा आयुक्त डॉ भाऊसाहेब दांगडे, पोलिस उपायुक्त सचिन गुंजाळ, सहाय्यक पोलिस आयुक्त सुनिल कुराडे यांच्यासह आमदार राजू पाटील, दिपेश म्हात्रे, राजेश मोरे, राजेश कदम, विश्वनाथ राणे, संतोष केणे आदि राजकीय पक्षातील पदाधिकार्यांनी धाव घेतली होती.