शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

कोपर रेल्वे स्थानकाजवळ रेल्वेतून पडून पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू

By मुरलीधर भवार | Updated: March 28, 2024 06:26 IST

रोहित रमेश किळजे असे रेल्वे गाडीतून पडलेल्या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे.

डोंबिवली: रेल्वेतून प्रवास करीत असताना प्रचंड गर्दीमुळे दरवाजात उभे राहून प्रवास करणाऱ्या एका २५ वर्षीय पोलीस कर्मचाऱ्याचा खाली पडून जागीच मृत्यू झाला. ही घटना बुधवारी सकाळच्या सुमारास कोपर रेल्वे स्थानकजवळ घडली. रोहित रमेश किळजे असे रेल्वे गाडीतून पडलेल्या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे.

डोंबिवली पश्चिमेकडील मथुरा अपार्टमेंट येथे हा पोलीस कर्मचारी राहात होता. मुंबईत ताडदेव येथील शशस्त्र पोलीस मुख्यालयात त्याची ड्युटी होती. रोहितच्या पश्चात आई आणि बहिण आहे. त्याचा मृतदेह चिपळूण येथील राहत्या घरी अंतिम विधीसाठी नेण्यात आला आहे.

वडिलांच्या अकस्मात  मृत्यूनंतर रोहित 2018 मध्ये पोलीस खात्यात त्यांच्या जागी नोकरीला लागला होता. तो आई आणि बहिणी सह डोंबिवलीत राहत होता. ताडदेव येथे मुख्यालयात कर्तव्यावर असलेला रोहित डोंबिवली ते दादर असा लोकल ट्रेन ने प्रवास करून तिथून ताडदेवपर्यंत जात असे. बुधवारी सकाळी ७ वाजून ४१ मिनिटांनी  डोंबिवलीहून निघालेल्या जलद लोकलने तो दादरकडे निघाला होता मात्र ट्रेनमध्ये गर्दी असल्याने तो दरवाजातच उभा होता कोपर दरम्यान त्याचा हात सुटल्याने तो चालत्या लोकलमधून खाली पडला.

टॅग्स :dombivaliडोंबिवली