शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
3
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
4
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
5
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
6
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
7
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
8
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
9
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
10
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
11
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
12
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
13
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
14
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
15
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
16
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
17
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
18
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
19
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
20
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
Daily Top 2Weekly Top 5

समस्यांपासून लक्ष विचलीत करण्यासठी भाजप शिंदे गटाची खेळी; मनसे आमदार राजू पाटील यांनी काढला चिमटा

By मुरलीधर भवार | Updated: June 12, 2023 15:45 IST

नागरीकांच्या समस्यांपासून लक्ष विचलीत करण्यातासाठी भाजप-शिंदे गटाची ही खेळी आहे.

कल्याण-नागरीकांच्या समस्यांपासून लक्ष विचलीत करण्यातासाठी भाजप-शिंदे गटाची ही खेळी आहे. युती शंभर टक्के होणार आहे. कल्याण लोकसभेत शिवसेनेचाच उमेदवार राहणार आहे. ही मंडळी पुन्हा एकत्रित काम करणार असा चिमटा कल्याण ग्रामीणचे मनसे आमदार राजू पाटील यांनी काढला आहे.डोंबिवलीतील सावित्रीबाई फुल नाट्यमंदिरात मनसे पदाधिकाऱ््यांचे प्रशिक्षण शिबीर आज आयोजित करण्यात आले आहे. या शिबीराला आमदार पाटील हे उपस्थित होते. यावेळी त्यांनी उपरोक्त विधान केले.

मंत्री मंडळाचा विस्तार होणार आहे. या विस्तारात शिंदे गटातील पाच मंत्र्यांची गच्छंती होणार आहे. त्यासाठी शिंदे यांच्यावरभाजपचा दबाव आहे. ही चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. या विषयी मनसे आमदार पाटील यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी भाजपसह शिंदे गटाला टोला लगावला आहे. काही दिवसापूर्वी आलेल्या सर्व राजकीय सर्व्हेक्षणात शिंदे गटाला कमी स्थान दिले आहे. जनसामान्यांचे लक्ष दुसरीकडे वळविण्याकरीता चाललेली ही राजकीय खेळी आहे. २०१५ साली कल्याण डोंबिवलीत शिवसेना भाजप भांडत होते. त्यानंतर पुन्हा युती केली. ही मंडळी एकाच थाळीचे चट्टेबट्टे आहेत.

एका पाेलिस अधिकाऱ््यावरुन एवढे राजकारण करण्याची गरज नाही. गृह खाते भाजपकडे आहे. अधिकाऱ््याची बदली करायची झाल्यास ते करु शकतात. मात्र त्यावरुन सहकार्य न करण्याचा ठराव भाजपने मंजूर करणे, त्यानंतर खासदार शिंदे यांनी राजीनामा देण्यास तयार असल्याचे सांगणे हा सगळा प्रकार नागरीकांच्या समस्यापासून लक्ष विचलित करण्याचा आहे. ते निवडणूकीत शंभर टक्के युती करणार. कल्याण लोकसभेतून शिवसेनेचा खासदार निवडणूक लढविणार हे पक्के आहे. शिवसेनेच्या खासदाराचा निवडणूकीत प्रचार भाजप करणार असे आमदार पाटील यांनी सांगितले.

आळंदी येथे वारकऱ्यांवर झालेला लाठीचार्ज दुर्दैवी आहे. वारकऱ्यांच्या संपूर्ण इतिहासात ही घटना अत्यंत दुःखद आहे. गृह मंत्रालयाने याची दखल घेतली पाहिजे . पोलीस पोलिसांचं काम करतात हे मान्य मात्र वारकरी अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने करत असतात. पोलीस जास्त अमानुषपणे वागले हे निषेध करण्यासारखीच गोष्ट असल्याचे आमदार पाटील यांनी सांगितले.