शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

मध्यवर्ती रुग्णालयात महिलेच्या पोटातून काढला अर्धा किलोचा गोळा

By सदानंद नाईक | Updated: November 29, 2023 16:55 IST

रुग्णालयाचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ मनोहर बनसोडे यांनी डॉ तृप्ती रोकडे यांच्यासह त्यांच्या टीमचे कौतुक करून प्रोत्साहन दिले आहे. 

उल्हासनगर : मध्यवर्ती रुग्णालयात एका महिलेच्या पोटातून अर्धा किलोचा पाण्याचा गोळा काढून डॉक्टरांनी जीवदान दिले. रुग्णालयाचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ मनोहर बनसोडे यांनी डॉ तृप्ती रोकडे यांच्यासह त्यांच्या टीमचे कौतुक करून प्रोत्साहन दिले आहे. 

उल्हासनगर कॅम्प नं-१, परिसरात राहणाऱ्या एका महिलेचा पोटात गेल्या तीन महिन्यापासून दुखत असल्याने, महिलेने सुरवातीला दुखणे अंगावर काढून स्थानिक डॉक्टरांकडून औषधोउपचार केले. मात्र दुखणे बसण्या ऐवजी वाढल्याने, महिला मध्यवर्ती रुग्णालयात दाखल झाली. डॉ तृप्ती रोकडे यांनी महिलेची तपासणी व सोनोग्राफी केली असता, पोटात गाठ आढळून आली.

डॉ रोकडे यांच्या टीमने तीन टाक्याची दुर्बिणीद्वारे दोन तास शस्त्रक्रिया करून अर्धा किलो वजनाच्या पाण्याची गाठ यशस्वीपणे बाहेर काढून महिलेला जीवदान देण्यात आले. महिला शस्त्रक्रियानंतर ठणठणीत असून काहीएक त्रास होणार नसल्याची प्रतिक्रिया डॉ रोकडे यांनी दिली. रुग्णालयाचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ मनोहर बनसोडे यांनी या शास्त्रक्रियेबाबत डॉक्टरांच्या टीमचे कौतुक करून प्रोत्साहन दिले आहे.

"रुग्णालय बदल राहा है" मध्यवर्ती रुग्णालयाच्या बाह्यरुग्ण विभागात दररोज १५०० पेक्षा जास्त रुग्ण उपचार घेत असून २०० बेड क्षमतेच्या रुग्णालयात दररोज ३०० पेक्षा जास्त रुग्ण उपचार घेत आहेत. रुग्णांची संख्या दुपट्ट वाढली असतांना व डॉक्टर, नर्स, वॉर्डबॉय आदींची संख्या कमी असतांनाही रुग्णालयात आरोग्य सेवा पुरविली जात आहे. रुग्णालयाच्या जिल्हा शल्यचिकित्सक पदी डॉ. मनोहर बनसोडे यांची नियुक्ती झाल्यावर त्यांनी विविध उपक्रम राबविले जात आहे. काही महिन्यांपूर्वी रुग्णालयाने अर्धा किलो वजनाचे कमी महिन्याचे बाळ वाचविले असून मोठ्या शस्त्रक्रियाचे प्रमाण वाढले आहे. डॉ बनसोडे यांनी रुग्णालय बदल रहा है अशी प्रतिक्रिया देऊन आदिवासी, गरीब, गरजू रुग्णांचे हक्काचे रुग्णालय झाल्याचे सांगितले. शासनाने इतर रूग्णालया प्रमाणे सुखसुविधा पुरविल्यास व राजकीय नेत्यांनी त्याबाबत पाठपुरावा केल्यास, जिल्ह्यात रुग्णालय नंबर एकवर राहणार असल्याचे डॉ बनसोडे म्हणाले. 

टॅग्स :ulhasnagarउल्हासनगर