शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

कल्याण ग्रामीणपाठोपाठ डोंबिवलीतील ३८ बिल्डर्सविरोधात गुन्हा दाखल

By प्रशांत माने | Updated: October 4, 2022 19:24 IST

बनावट कागदपत्रांच्या आधारे मिळविली बांधकामांची परवानगी

लोकमत न्यूज नेटवर्क, डोंबिवली: कल्याण ग्रामीणमधील २७ बिल्डरांच्या विरोधात येथील मानपाडा पोलीस ठाण्यात फसवणूकीचा गुन्हा दाखल झाला असताना सोमवारी रात्री उशीरा डोंबिवलीतील ३८ बिल्डरांच्या विरोधात रामनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. केडीएमसीच्या नगररचना विभागाच्या तक्रारीनंतर हा गुन्हा दाखल झाला आहे. बनावट कागदपत्रांच्या आधारे बांधकाम परवानगी मिळविल्याचा आरोप संबंधित बिल्डरांवर आहे. आतापर्यंत  ६५ बिल्डरांविरोधात गुन्हा दाखल झाल्याने एकच खळबळ उडाली आहे.

कल्याण डोंबिवलीतील बेकायदा बांधकामांचा मुद्दा नेहमीच चर्चेत असतो. केडीएमसी प्रशासनाकडून वारंवार कारवाईचे दावे केले जात असलेतरी मनपा हद्दीत सर्रास बेकायदा बांधकाम सुरू असल्याचे चित्र पहायला मिळते. बेकायदा बांधकामांवरून उच्च न्यायालयाने केडीएमसीला याआधीही फटकारले आहे. परंतू चित्र जैसे थे आहे. दरम्यान माहिती अधिकार कार्यकर्ते संदीप पाटील यांनीही बेकायदा बांधकामांबाबत मनपा प्रशासनाकडे तक्रार करताना उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. बनावट कागदपत्रे सादर करुन खोटया सही शिक्याच्या आधारे रेराचे प्रमाणपत्र मिळविल्याचा आरोप पाटील यांचा आहे. त्यांच्या आरोपानंतर केडीएमसीने या तक्रारीची चौकशी केली असता त्यांच्या आरोपात तथ्य आढळून आले.

अखेर मनपाच्या नगररचना विभागातील अधिका-यांच्या तक्रारीनंतर डोंबिवली मानपाडा पोलीस ठाण्यात २८ सप्टेंबरला २७ बिल्डरांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. सोमवारी रात्री उशीरा अशाच प्रकारे बनावट कागदपत्रांच्या आधारे इमारत बांधकामाची परवागनी मिळविणा-या ३८ बिल्डरांच्या विरोधात रामनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. महापालिकेच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू असल्याची माहीती रामनगर पोलीस ठाण्याचे वरीष्ठ पोलीस निरिक्षक सचिन सांडभोर यांनी दिली.

हा आहे आरोप

संबंधित ३८ बिल्डरांनी २०१९ पासून ते आतार्पयत बांधकाम करण्यासाठी केडीएमसीचा विकास अधिभार शुल्क न भरता बांधकाम परवानगीची बनावट कागदपत्रे तयार करून ती बांधकाम करण्याच्या जागी डोंबिवली परिसरात ती खरी आहेत असे भासवून सादर केली आणि महापालिकेची फसवणूक केली असा आरोप दाखल झालेल्या तक्रारीत त्यांच्यावर केला गेला आहे.

टॅग्स :kalyanकल्याणdombivaliडोंबिवली