शहरं
Join us  
Trending Stories
1
"चीनने भारताची जमीन बळकावली हे तुम्हाला कसं कळलं? तुम्ही खरे भारतीय असता तर…’’, सुप्रीम कोर्टाने राहुल गांधींना सुनावले खडेबोल  
2
“सप्टेंबरमध्ये देशात मोठ्या राजकीय घडामोडी”; संजय राऊतांचे भाकित, म्हणाले, “RSS बैठकीत...”
3
'तो' खेळणार नाही असं इंग्लंडनेच सांगितलं होतं, पण आता बॅटिंग करणार; असं कसं? ICC नियमांत बसतं?
4
पाणी पाकिस्तानची पाठ सोडेना! उन्हाळ्यात पाणी प्यायला मिळेना, पावसाळ्यात महापूर
5
"२० वर्षांनी आम्ही भाऊ एकत्र येऊ शकतो, मग..."; मनसे मेळाव्यात राज ठाकरेंचा कार्यकर्त्यांना कानमंत्र
6
रेपो दराच्या बैठकीपूर्वी सोन्या-चांदीच्या दरात वाढ, तुमच्या शहरात २४ कॅरेट सोन्याचा भाव काय?
7
"माझ्या नादी लागू नका, पुराव्यासह फाईल्स उघडू..."; भाजपात प्रवेश करताच शिंदेसेनेच्या नेत्याला इशारा
8
"मुंबईत जो येईल त्याचं स्वागत करू..."; निशिकांत दुबेंबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
9
रॉयल एनफिल्डने चीनचे रेअर अर्थ मटेरिअल टाळले! नवीन धातू वापरला, ऑटो कंपन्या चकीत झाल्या...
10
काहीही करा, ‘हम नही सुधरेंगे’; CM देवेंद्र फडणवीसांचा क्लास वाया, वादग्रस्त विधाने सुरूच!
11
AI घेणार तुमच्या नोकरीची जागा? गुंतवणूकदार विनोद खोसला यांचा इशारा, म्हणाले यातून वाचायचं असेल तर..
12
‘झुकेगा नही’! ट्रम्प यांची धमकी, पण सरकार ठाम; अमेरिकेला भारताचं स्वतंत्र धोरण का खुपतंय?
13
मराठी अभिनेत्याचं साउथ इंडस्ट्रीत काम करण्याचं होतं स्वप्न, लॉकडाऊननंतर हैदराबाद गाठलं अन्...
14
चहा करताना 'ही' छोटीशी चूक कराल तर आयुष्याला मुकाल, योग्य पद्धत कोणती एकदा बघाच
15
ऑपरेशन महादेवमध्ये मारले गेलेले सगळे दहशतवादी पाकिस्तानीच! 'त्या' एका पुराव्याने समोर आली कुंडली
16
IND vs ENG: ३५ धावा की ४ गडी... पाचवी कसोटी निर्णायक वळणावर, 'हा' घटक भारतासाठी ठरेल 'गेमचेंजर'
17
ट्रम्प यांच्यासोबतची मैत्री तुटल्यानंतर मस्क मोठ्या अडचणीत; टेस्लाला द्यावे लागणार तब्बल २ हजार कोटी
18
ट्रम्पच्या जिगरी दोस्तावर पाकिस्तान का चिडला? पोस्ट लिहीत व्यक्त केला राग! शाहबाज शरीफ म्हणाले... 
19
"सचिन माझ्या मुलाचा बाप...", महिलेने दाखवला DNA रिपोर्ट; राजा रघुवंशीच्या घरात भलताच वाद
20
हृदयस्पर्शी! बाळासाठी वडील झाले वासुदेव, पुराच्या पाण्यातून काढली वाट, भावुक करणारा Video

१६ वर्षीय मुलीची गळफास घेऊन आत्महत्या

By प्रशांत माने | Updated: October 27, 2022 16:44 IST

या घटनेची नोंद रामनगर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क

डोंबिवली: दहावीतील विद्यार्थीनीने रहात्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना ताजी असतानाच बुधवारी भाऊबीजेच्या दिवशी ज्योती ठाकुर या १६ वर्षीय मुलीने रहात्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना पुर्वेकडील तुकारामनगरमध्ये घडली. ज्योतीने आत्महत्या का केली याचे कारण समजू शकलेले नाही.

ओमप्रकाश ठाकूर हे आयरेरोड, तुकारामनगरमधील रतन भगत चाळीत पत्नी, तीन मुली आणि एका मुलासह राहतात. ओमप्रकाश यांचा कपडे विक्रीचा व्यवसाय आहे. ते बुधवारी रात्री पत्नी आणि मुलासह दुकानावर गेले होते. त्यांच्या मुली घरीच होत्या. मुलगी खुशबु आणि राणी या घराबाहेर खेळण्यासाठी गेल्या होत्या. ज्योती घरामध्ये एकटीच होती. खुशबु आणि राणी खेळून घरी आल्या तेव्हा दरवाजा आतुन बंद होता. त्यावेळी राणीने दाराच्या फटीतून आतमध्ये हात घालीत आतील कडी उघडून घरात प्रवेश केला. त्यावेळी खुशबु आणि राणीला ज्योती किचनमधील सीलींग फॅनला ओढणीने गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आली. 

दोघींनी तत्काळ याची माहीती वडीलांना दिली. ओमप्रकाश यांनी पत्नीसह घराकडे धाव घेतली. ओढणीने गळफास घेतलेल्या अवस्थेत असलेल्या ज्योतीला आजुबाजुच्या लोकांच्या मदतीने खाली घेतले आणि तीला लागलीच केडीएमसीच्या शास्त्रीनगर रूग्णालयात उपचारार्थ नेण्यात आले. परंतू तेथील डॉक्टरांनी तपासून तीला मृत घोषित केले. या घटनेची नोंद रामनगर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

टॅग्स :dombivaliडोंबिवली