शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

दाेन महिन्यांत तयार केला ७०० टनांचा गर्डर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2020 12:12 IST

रिषी अग्रवाल यांची माहिती

मुरलीधर भवारकल्याण : शंभर वर्षे जुना ब्रिटिशकालीन कल्याणचा पत्रीपूल हा वाहतुकीसाठी धोकादायक झाल्याने तो पाडण्यात आला. हा पूल नव्याने तयार करण्यासाठी त्याचा भला मोठा गर्डर तयार करण्याचे काम हैदराबाद येथील ग्लोबल स्टील कंपनीला देण्यात आले. दिवसरात्र एक करून कंपनीने अवघ्या दोन महिन्यांत ७०० टन वजनाचा ७६ मीटर लांबीचा भला मोठा गर्डर तयार केला.  अनेक अडचणींवर मात करून या गर्डरचे लाॅंंचिंग सुरू आहे. कंपनीसाठी ही अभिमानाची बाब असल्याचे ग्लोबल कंपनीचे प्रमुख रिषी अग्रवाल यांनी सांगितले.

कल्याण रेल्वेवरील पत्रीपुलाचे पाडकाम केल्यावर नागरिकांना वाहतूककोंडीचा सामना करावा लागत हाेता. कंत्राट मिळालेल्या ग्लोबल कंपनीतील ५० कामगारांनी राबून गर्डर बनवला. ताे हैदराबाद येथून कल्याणला आणायचा, ताेच मार्चमध्ये कोरोनामुळे लॉकडाऊन झाले. पत्रीपुलाच्या कामासाठी सातत्याने पाठपुरावा करणारे कल्याणचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी तेलंगणा सरकारकडे मागणी करून गर्डर कल्याणला नेण्याची विशेष परवानगी मिळवली. त्यानंतर विशेष वाहनांची सोय करून ताे येथे आणण्यात आल्याचे अग्रवाल यांनी सांगितले. ग्लोबल कंपनीने आतापर्यंंत १५ गर्डर तयार केले आहेत.  मुंबई-दहिसर मेट्रोच्या कामात व जेएनपीटी येथे लागणारे गर्डरही या कंपनीने बनवले आहेत.

किमान १०० वर्षे आयुष्यओपन वेब असलेला भला मोठा गर्डर असून त्यासाठी सीएनसी कटिंग, सीएनसी ड्रिलिंग आणि सीएनसी वेल्डिंग केलेले आहे. जवळपास २५ किलोमीटरचे वेल्डिंग केलेले आहे. गर्डरसाठी ई-५३ ग्रेडचे स्टील वापरलेले आहे. २६ हजार बोल्टचा वापर केला आहे. त्यासाठी युरोपियन मशिनरीचा वापर करण्यात आला आहे. या पुलाचे आयुष्य किमान शंभरपेक्षा अधिक वर्षांचे आहे. गर्डर कमी वेळेत तयार करण्याचे आव्हान आमच्या कामगारांनी दिवसरात्र राबून पेलले, असे अग्रवाल म्हणाले.

 

टॅग्स :thaneठाणे