शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

"बाळ रेनकोटमधून कधी पडलं समजलच नाही"; आजोबांनी सांगितली काळजात चर्र करणारी घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2023 12:41 IST

ठाकुर्ली ते कल्याणदरम्यान नाल्यात पडलेल्या रिषिका रुमाल (६ महिने) हिच्यावर मुंबईतील वाडिया रुग्णालयात उपचार सुरू होते.

ठाकुर्ली ते कल्याणदरम्यान नाल्यात पडलेल्या रिषिका रुमाल (६ महिने) हिच्यावर मुंबईतील वाडिया रुग्णालयात उपचार सुरू होते. बुधवारी त्याच उपचारासाठी या तान्हुलीला घेऊन तिचे आजोबा व आई गेले होते. परत येताना पावसाने रेल्वेसेवेला फटका बसल्याने त्यांनी रेल्वे मार्गावर उतरून प्रवास सुरू केला. पावसापासून नातीचे संरक्षण व्हावे म्हणून आजोबांनी तिला रेनकोटमध्ये घेतले होते. मात्र, अचानक त्यातून ती निसटली आणि नाल्यात पडली. 

कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, योगिता शंकर रुमाल या बाळंतपणासाठी हैदराबाद येथून आपल्या माहेरी भिवंडीत आल्या होत्या. बुधवारी तिच्या नियमित तपासणीसाठी योगिता आपले वडील ज्ञानेश्वर पोंगुल यांच्या सोबत मुंबईला गेली होती. जाताना ते गाडीने गेले होते, स्टेशनवर दुपारी गर्दी नसल्याने मुंबईहून अंबरनाथ लोकलने ठाकुर्लीपर्यंत आले. कल्याण स्थानकात उतरून त्यांना भिवंडीला जायचे होते. मात्र, मुसळधार पावसाने रेल्वे सेवा बंद झाल्याने योगिता, वडील ज्ञानेश्वर हे चिमुकल्या रिषिकाला घेऊन रेल्वेमार्गातून चालत निघाले होते 

ज्ञानेश्वर पोंगुल यांनी त्या दिवशी नेमकं काय घडलं हे सांगितलं आहे. "दोन-तीन तास लोकल रेल्वे ट्रॅकवर थांबली होती. सर्वजण खाली उतरून जात होते. आम्ही पण लोकलमधून खाली उतरून जाण्याचं ठरवलं. ट्रॅकवर चालत असताना आधी माध्या मुलीचा पाय घसरला आणि त्यानंतर मी तिला सावरलं आणि माझ्या नातीला मी रेनकोटमध्ये गुंडाळून माझ्या हातात घेतलं होते. मात्र माझाही पाय घसरला आणि माझ्या हातात असलेली माझी नात रेनकोटमधून कधी नात्यात पडली मला समजलंच नाही."

"बाळ पडल्याचं लोकांच्या लक्षात आल्यानंतर रेनकोटमध्ये बाळ नसल्याचं आमच्या लक्षात आले. मात्र तोपर्यंत माझी नात नाल्यात वाहून गेली होती" असं ज्ञानेश्वर यांनी सांगितले. माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी ही माहिती दिली. दुर्दैवी रिषिकाची आई योगिता ही भिवंडीतील धामणकर नाका परिसरातील राहणारी आहे. पाच ते सहा महिन्यांची ही मुलगी असून तिचे नाव रिषिका ठेवण्यात आले होते. ठाकुर्ली कल्याण मार्गावर रुळाखालील नाल्यात पडून रिषिका रुमाल या लहान बाळाचा शोध तिसऱ्या दिवशीही तपास यंत्रणेला लागला नाही. एनडीआरएफने गुरुवारीच तपास थांबवला होता. स्थानिक अग्निशमन यंत्रणा आणि लोहमार्ग पोलिसांनी मात्र तिचा शोध सुरूच ठेवला आहे. 

टॅग्स :kalyanकल्याण