शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

कल्याण डोंबिवलीतील गणेशोत्सवावर २१७० CCTV कॅमेऱ्याची नजर

By मुरलीधर भवार | Updated: August 29, 2022 15:27 IST

गणेशोत्सवासाठी पोलिस प्रशासन सज्ज, पोलिस उपायुक्त सचिन गुंजाळ यांची माहिती

मुरलीधर भवार

कल्याण- गेली दोन वर्षे कोरोनामुळे गणोशोत्सव र्निबधात पार पडला. कोरोनाचा प्रादूर्भाव कमी झाल्याने यंदाच्या गणेशोत्सव उत्सहात साजरात केला जाणार आहे. गणेशोत्सवात उत्सवाचे पावित्र्य राखले जावे आणि सुरक्षितता पाळली जावी यासाठी 2 हजार 170 सीसीटीव्हीची कॅमे:यांची नजर उत्सवावर राहणार असल्याची माहिती कल्याणचे पोलिस उपायुक्त सचिन गुंजाळ यांनी दिली आहे. 

उपायुक्त गुंजाळ यांनी सांगितले की, कल्याण डोंबिवली हद्दीत 287 सार्वजनिक गणेश उत्सव मंडळांकडून गणोश मूर्तीची स्थापना केली जाणार आहे. तसेच घरगूती गणपतींची संख्या 42 हजार 270 आहे. त्याचबरोबर घरगूती गौरी पूजनाची संख्या 3 हजार 467 आहे. गणोशोत्सव आनंदात साजरा केला जात असल्याने काही नियमांचे पालन करण्याचे आवाहन मंडळासह नागरीकांना करण्यात आले आहे. एक कॅमेरा देशासाठी आणि समाजासाठी या पोलिसांच्या उपक्रमांतर्गत शहरात 1 हजार 527 कॅमेऱ्यांच्या माध्यमातून उत्सवावर ठेवली जाणार आहे. त्याचबरोबर कल्याण डोंबिवली महापालिकेच्या स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत लावण्यात आलेल्या 643 सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या माध्यमातून नजर ठेवली जाणार आहे. याशिवाय सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी गणेश मूर्तीचे पावित्र्य राखले जावे यासाठी सीसीटीव्ही लावण्याचे सूचित केले आहे.

गणेशोत्सव पार पडल्यावर हा कॅमेरा मंडळांनी शेजारच्या चौकात एक कॅमेरा देशासाठी आणि समाजासाठी या उपक्रमांतर्गत लावायचा आहे. गणेशोत्सव काळात एक हजार पोलिस बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आले आहे. 150 पोलिस अधिकारी, 250 होमगार्ड आणि एसआरपीच्या दोन पालटून बंदोबस्तासाठी ठेवण्यात आल्या आहेत. याशिवाय वाहतूकीत बदल करण्यात आला आहे. ज्याठिकाणी अवजड वाहनांना बंदी आहे. तसेच एकेरी वाहतूक आहे. याचे पालन वाहन चालकांसह गणेश भक्त आणि मंडळांनी करायचे आहे. त्याची अधिसूचना ठाणे वाहतूक नियंत्रम पोलिस कार्यालयाकडून काढण्यात आली आहे.

टॅग्स :Ganesh Mahotsavगणेशोत्सव