शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

पर्यावरण दक्षता मंडळाच्या २७ बागप्रेमींच्या २१० झाडांची डोंबिवलीत कल्पक मांडणी, प्रदर्शन

By अनिकेत घमंडी | Updated: June 14, 2024 12:19 IST

पर्यावरणप्रेमी नागरिकांचा चांगला प्रतिसाद

अनिकेत घमंडी, डोंबिवली: महानगरपालिका आणि पर्यावरण दक्षता मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आनंद बालभवन, डोंबिवली येथे जागतिक पर्यावरण दिनानिमित्त "निसर्गोत्सव 2024" या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. पर्यावरण दक्षता मंडळाच्या २७ बागप्रेमींच्या २१० झाडांची कल्पक मांडणी करून प्रदर्शन भरवण्यात आले होते.

डोंबिवलीतील पर्यावरण दक्षता मंडळ या संस्थेच्या ग्रीन लवर्स क्लबच्या सभासदांच्या आणि स्वयंसेवकांच्या कुंडीतील झाडांचे प्रदर्शन, पर्यावरणपूरक उत्पादनाचे स्टॉल, बागकाम कार्यशाळा, ट्रे लँडस्केप स्पर्धा, तसेच सापांविषयी जनजागृती सत्र असा कार्यक्रम  आयोजित करण्यात आला.

महानगरपालिकेच्या आयुक्त मा. डॉ. इंदूराणी जाखड यांच्या हस्ते "निसर्गोत्सव 2024" चे उद्घाटन व बाग प्रेमींचा कौतुक समारंभ पार पडला.  “निसर्गोत्सव 2024” च्या पहिल्या दिवसाच्या पहिल्या सत्रात  दुपारी ट्रे लँडस्केप स्पर्धा घेण्यात आली ज्यात कल्याण व डोंबिवलीतील १० बागप्रेमींनी आपल्या कल्पकतेने सुंदर व वेगवेगळ्या संकल्पनेवर आधारित ट्रे लँडस्केप तयार केले. सायंकाळी दुसऱ्या सत्रात कुंडीतील फुलझाडे या विषयावर मीनल मांजरेकर यांनी कार्यशाळा घेतली.

 “निसर्गोत्सव 2024” च्या पहिल्या सत्रात दुपारी सेवा संस्था डोंबिवली च्या कार्यकर्त्यांनी सापांविषयी माहिती आणि प्रथमोपचार यावर मार्गदर्शन सत्र घेतले. दुसऱ्या सत्रात डॉ. श्रेया भानप यांनी "वृक्षारोपण: कला आणि शास्त्र" या विषयावर कार्यशाळा घेतली. त्यानंतर सायंकाळी महेश देशपांडे यांच्या हस्ते ट्रे लँडस्केप स्पर्धेच्या विजेत्यांचे बक्षीस देऊन सत्कार करण्यात आले व ग्रीन लवर्सचे सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. निसर्गोत्सव 2024 च्या समारोपाच्या वेळी आर के बझार तर्फे सर्व सहभागींना 'निर्मल्यप्रभा' हे निर्माल्य खत मोफत उपलब्ध करून देण्यात आले.

कुंडीतील झाडांचे प्रदर्शन सर्वांसाठी खुले होते. बालभवन डोंबिवली येथे झाडांचे प्रदर्शन, बागकाम कार्यशाळा, स्पर्धा आणि जनजागृती उपक्रमासाठी कल्याण डोंबिवली महानगरपालिके कडून आवश्यक सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या होत्या. कार्यक्रमाच्या पूर्वतयारी पासून ते समारोपापर्यंत सर्व उत्साही ग्रीन मेंबर्स यात सहभागी होते. डॉ. अंजली रत्नाकर, मिनल मांजरेकर आणि डॉ. श्रेया भानप यांच्या मार्गदर्शनामुळे स्पर्धा आणि कार्यशाळांचे आयोजन झाले. पर्यावरण दक्षता मंडळाचे समन्वयक रूपाली शाईवाले, आदित्य कदम आणि समीक्षा चव्हाण यांनी संपूर्ण कार्यक्रमाचे संयोजन केल्याचे महापालिका जनसंपर्क विभागाने सांगितले.

टॅग्स :dombivaliडोंबिवली