शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
2
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
3
"...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
4
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
5
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
6
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
7
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
8
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
9
भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
10
Payal Nag : नियतीला झुकवणाऱ्या पायलची सुवर्णगाथा! अपघातात हात-पाय गमावले, तिरंदाजीतून जग जिंकले
11
LSG vs GT : पंतसमोर पहिला डाव जिंकला; गिलचा आनंद गगनात मावेना! 'तो' व्हिडिओ व्हायरल
12
युद्धविराम रद्द झाला तर जगावर मोठे संकट येणार; जागतिक बँकेचे प्रमुख अजय बंगा यांचा इशारा
13
सोशल मीडियाचा अतिवापर आणि अश्लील कंटेंटला बसणार लगाम! इन्स्टाग्रामने आणले नवीन 'टीन रूल्स'
14
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
15
US-इराणमधील चर्चा फिस्कटली, पुन्हा युद्धाचे ढग; भारत अलर्ट मोडवर, 'स्पेशल ऑपरेशन' लॉन्च
16
अमेरिका-इराण चर्चा निष्फळ! पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया आली समोर; परराष्ट्र मंत्री इशाक डार म्हणाले...
17
“चंदेरी दुनियेच्या सफरीचा आनंद देणारा दैवी आवाज शांत झाला”; DCM शिंदेंकडून आशाताईंना आदरांजली
18
Asha Bhosale Songs: आशा भोसलेंची 'ही' गाणी प्रचंड गाजली! आजही ऐकली की चेहऱ्यावर हसू अन् डोळ्यांत पाणी येतं
19
आशा ताईंना सर्वात जास्त प्रिय होता 'डाळ-भात', स्वतः बनवायच्या 'हे' खास लोणचं; साध्या राहणीमानानंही जिंकली चाहत्यांची मनं
20
२० भाषा अन् १२ हजारांहून अधिक गाणी! 'असा' होता आशा भोसले यांचा संगीत विश्वातील प्रवास
Daily Top 2Weekly Top 5

वीज वितरण कंपनीची थकबाकी केली चुकती, अदानी समूहाकडून १.६९ कोटींचा धनादेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2021 05:12 IST

आंबिवली मोहने येथील एनआरसी कंपनीची जागा अदानी समूहाने लिलावात घेतली आहे. या कंपनीकडे वीज बिलापोटी असलेली थकबाकीची रक्कम अदानी समूहाने चुकती केली आहे.

कल्याण : आंबिवली मोहने येथील एनआरसी कंपनीची जागा अदानी समूहाने लिलावात घेतली आहे. या कंपनीकडे वीज बिलापोटी असलेली थकबाकीची रक्कम अदानी समूहाने चुकती केली आहे. त्यासाठी १ कोटी ६९ लाख रुपयांचा धनादेश वीज वितरण कंपनीला मंगळवारी सुपूर्द करण्यात आला. एनआरसी कंपनी २००९ साली आर्थिक कारणास्तव बंद पडली. त्यामुळे वीज बिलाचा नियमित भरणा कंपनीकडून केला जात नव्हता. दरम्यान, आर्थिक संस्थांनी एनआरसीविरोधात २०१८ मध्ये दिवाळखोरी आणि नादारी कायद्याच्या अंतर्गत राष्ट्रीय कंपनी कायदा लवादामध्ये कर्ज वसुलीचा दावा दाखल केला होता. लवादाच्या आदेशानुसार कोर्टाने जो नादारी आदेश काढला, त्या आधीची सर्व देणी रद्दबातल ठरतात. त्यामुळे आयबीसी कायद्याच्या तरतुदीनुसार कोर्टाच्या नादारी आदेशाच्या दिवसापासून जे विजेचे बिल असेल तेवढेच बिल अदानी समूह देणे लागतो. त्यानुसार अदानी समूहाने वीज वितरण कंपनीकडे त्यांचे म्हणणे मांडले. त्यानंतर वीज वितरण कंपनीने अदानी समूहाला १ कोटी ६९ लाख रुपयांचे बिल पाठविले होते.  पंपहाऊसचे बिल थकीतएनआरसीचा वीज पुरवठा २०१६ साली वीज कंपनीने खंडित केला होता. अनेक निवेदने प्राप्त झाल्यावर ज्या पंप हाउसमधून पाणीपुरवठा केला जातो, त्या लाइनचा पुरवठा सुरू केला होता. मात्र कंपनीकडून पंप हाउसचेही बिल भरले जात नव्हते. त्या कारणावरून कंपनी आणि वीज वितरण कंपनीत वादविवाद सुरू होते. 

टॅग्स :electricityवीजkalyanकल्याण