शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

१६०० कुत्रे, मांजरीना रेबीज लस; रॅलीला प्राणीमित्र, नागरिकांचा सहभाग

By अनिकेत घमंडी | Updated: September 30, 2023 18:13 IST

रोटरी क्लब ऑफ डोंबिवली मिडटाऊनचा उपक्रम

अनिकेत घमंडी, डोंबिवली: रोटरी क्लब ऑफ डोंबिवली मिडटाऊन तर्फे दर वर्षीप्रमाणे या वर्षी रेबीज दिनानिमित्त एक आठवड्याचा भटक्या श्र्वानांसाठी रेबीज लसीकरणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात ०९ ते १५ सप्टेंबर या कालावधीत १६००हून अधिक भटके कुत्रे व भटक्या मांजरींना रेबीज प्रतिबंधक लस टोचण्यात आली. शनिवारी गणेश मंदिर डोंबिवली येथून एक रॅली काढण्यात आली.

त्या रॅलीमध्ये रोटरॅक्ट क्लब ऑफ डोंबिवली मिडटाऊन युथचे सदस्य, प्रकाश विद्यालय, महात्मा गांधी विद्यामंदिर, न्यू केंब्रिज स्कूल, प्रगती कॉलेज, रॉयल कॉलेज व एम के एम पटेल कॉलेजचे विद्यार्थी सहभागी झाले होते. तसेच अनेक श्वानप्रेमी, प्राणी प्रेमी, व्हिपीडब्ल्यूए चे सदस्य व रोटरी सदस्य या रॅलीत सहभागी झाले होते.

रॅली नंतर एका चर्चासत्राचे आयोजन गणेश मंदिर हॉल येथे करण्यात आले होते. या चर्चासत्रास रोटरी डिस्ट्रिक्ट चे डिस्ट्रिक्ट सेक्रेटरी मनोज पाटील व असिस्टंट गव्हर्नर शैलेश गुप्ते हे प्रमुख अतिथी व विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते. याप्रसंगी रोटरी क्लब ऑफ डोंबिवली मिडटाऊनचे माजी अध्यक्ष डॉक्टर मनोहर अकोले व अध्यक्ष प्रदीप बुडबाडकर यांची भाषणे झाली. या चर्चासत्रात बोलताना रो. मनोज पाटील व रो. शैलेश गुप्ते यांनी क्लबच्या या उपक्रमाचे कौतुक केले. रोटरी क्लबचे माजी अध्यक्ष डॉ मकरंद गणपुले यांनी कार्यक्रमाचे सूत्र संचालन केले व माजी अध्यक्ष अजय कुलकर्णी यांनी आभार प्रदर्शन केले.

टॅग्स :dombivaliडोंबिवली