शहरं
Join us  
Trending Stories
1
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
2
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
3
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
4
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
5
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
6
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
7
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
8
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
9
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
10
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
11
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
12
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
13
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
14
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
15
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
16
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
17
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
18
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
19
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
20
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?

खोट्या कागदपत्राद्वारे १ हजार बांधकाम प्रमाणपत्र लाटली; MCHI चा गौप्यस्फोट

By मुरलीधर भवार | Updated: November 25, 2022 21:34 IST

कल्याण डोंबिवलीतील बेकायदा बांधकाम करणाऱ्या 65 बिल्डरांनी महापालिकडून परवानगी मिळविल्याचे भासवून रेराकडून बांधकाम प्रमाणपत्र मिळविल्याचे उघड झाले

कल्याण-अधिकृत बांधकाम करणाऱ्या बिल्डरांना सर्व नियम कायदे पाळावे लागतात. मात्र बेकायदा बांधकाम करणाऱ्या बिल्डरांना कुठलीही बंदी नसते. त्यामुळे अधिकृत बांधकाम करणाऱ्या बिल्डरांची बदनामी आणि डोकेदुखी होते. रेरा प्राधिकरणाला खोटी कागदपत्रे सादर करुन कल्याण डोंबिवलीतच नव्हे तर राज्यभरातून एक हजार बांधकाम नोंदणी प्रमाणपत्र रेराकडून मिळविली असल्याचा गौप्यस्फोट कल्याण डोंबिवली क्रेडीया एमसीएचआयचे माजी अध्यक्ष रवी पाटील यांनी केला आहे. 

कल्याण डोंबिवलीतील बेकायदा बांधकाम करणाऱ्या 65 बिल्डरांनी महापालिकडून परवानगी मिळविल्याचे भासवून रेराकडून बांधकाम प्रमाणपत्र मिळविल्याचे उघड झाले. या प्रकरणी एसआयटी आणि ईडीकडून तपास सुरु आहे. हे प्रकरण उघडकीस आणणारे वास्तू विशारद संदीप पाटील यांच्या धाडसाचे एमसीएचआयने कौतूक केले आहे. मात्र या प्रकरणी ईडीकडून चौकशी सुरु असल्याने कल्याण डोंबिवलीतील अधिकृत बांधकाम करणाऱ्या बिल्डरांचीही बदनामी होत असल्याची बाब एमसीएचआयच्या वतीने आज पत्रकार परिषद घेऊन स्पष्ट करण्यात आली. या प्रसंगी एमसीएचआयचे अध्यक्ष भरत छेडा, पदाधिकारी अरविंद वरक, विकास वीरकर, राहूल कदम, दिनेश मेहता, संजय पाटील, रोहित दीक्षित आणि सुनिल चव्हाण आदी उपस्थित होते. 

या पत्रकार परिषदेत माजी अध्यक्ष पाटील यांनी उपरोक्त गौप्यस्फोट केला. पाटील यांनी सांगितले की, महापालिकेनी परवानगी नसताना खोटय़ा प्रमाणपत्रच्या आधारे रेराला बांधकाम नोंदणी करणा:याची शहानिशा रेरा प्राधिकरणाकडून होणो गरजेचे आहे. हे का झाले तर रेरा आणि महापालिका प्रशासन यांच्या समन्वय नसल्याने हे प्रकरण घडले. यात घर घेणारा समान्य माणूस भरडला जातोय. त्याची आर्थिक फसवणूक झाली आहे.  कारण बेकायदा बांधकामात घर घेणा:याची नोंदणी केली जात नाही. त्यांना टॅक्स लागवण्यापासून वीज आणि पाणी कनेक्शन घेण्यात अडचणी येतात. 

अधिकृत बांधकाम करणारे बिल्डर हे टॅक्स भरतात. विकास कर देतात. मात्र सरकारचा कोटय़ावधी रुपयांचा महसूल बेकायदा बांधकाम करणा:या बिल्डरांनी बुडविला आहे. 65 बिल्डर फसवणूक प्रकरणात अडकलेले बिल्डर हे एमसीएचआयशी संबंधीत नाहीत. मात्र प्रकरणामुळे अधिकृत बिल्डरांचीच नव्हे तर कल्याण डोंबिवली शहराची बदनामी होत आहे. त्याचा फटका अधिकृत बांधकाम करणा:या बिल्डरांना बसला आहे. रेरा कडून यापूर्वी अधिकृत बांधकाम करणा:या  दहा दिवसात बांधकाम नोंदणी प्रमाणपत्र मिळत होते. आत्ता त्याला तीन ते पाच महिने लागत आहे. हे सगळे प्रकार रोखण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा कार्यान्वीत करण्यात यावी या करीता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची एमसीएचआयच्या वतीने लवकरच भेट घेतली जाणार असल्याचे पाटील यांनी सांगितले.