शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

कल्याणमध्ये भटक्या कुत्र्याच्या पाठीतून काढला दीड किलोचा ट्यूमर

By मुरलीधर भवार | Updated: December 30, 2023 17:11 IST

प्राणी रुग्णालयात यशस्वी शस्त्रक्रिया करुन त्या भटक्या कुत्र्याला जीवदान देण्यात आले आहे.

कल्याण-कल्याणमधील एका भटक्या कुत्र्याच्या पाठीतून दीड किलो वजनाचा ट्यूमर काढण्यात आला आहे. पॉज या प्राणी मित्र संस्थेच्या मदतीने त्या भटक्या कुत्र्या मुरबाड येथील प्राणी रुग्णालयात यशस्वी शस्त्रक्रिया करुन त्या भटक्या कुत्र्याला जीवदान देण्यात आले आहे.

पॉज ही समाजिक संस्था ठाणे जिल्हयात २३ वर्षापासून कार्यरत आहे. कल्याण डाेंबिवली ते बदलापूर परिसरात ही संस्था पशू कल्याण, वन्यजीव पुनर्वसनाकरीता काम करीत आहे. गेल्या आठवड्यात पॉजच्या हेल्पलाइन ला एका श्वानाबद्दल कॉल आला. पॉजचे स्वयंसेवक देवेंद्र निलाखे आणि जयश्री या दोघांनी त्या भटक्या कुत्र्याला पॉज संस्थेच्या मुरबाड येथील पशू रुग्णालयात दाखल केले. मुरबाडचे पशु रुग्णालय हे अख्ख्या ठाणे जिल्ह्यातील एकमेव रुग्णालय आहे की जिथे केवळ भटक्या, वेवासर आणि देशी कुत्र्यांवर उपचार केले जातात. या भटक्या कुत्र्याच्या शस्त्रक्रियेकरीता कोणतीही आर्थिक मदत घेण्यात आली नाही. त्यावर मोफत शस्त्रक्रिया करण्यात आल्याचे संस्थेचे संचालक निलेश भणगे यांनी दिली आहे.

संस्थेच्या विश्वस्त अनुराधा रामस्वामी यांनी सांगितले की, अशी शस्त्रक्रिया करण्यासाठी कोणत्याही संस्थेकडे लगेच सर्व गोष्टी उपलब्ध नसतात. मात्र पॉजने त्या सगळ्याची व्यवस्था केली. या भटक्या कुत्र्यावर शस्त्रक्रिया करण्यासाठी पुण्याहून डॉ. विनय भगत यांचा पाचारण करण्यात आले. त्यांनी पॉजचे डॉ. प्रज्वल भारती, डॉ. प्रदीप शंगारे आणि रिघा परमेश्वरन ह्यांचा मदतीने सुमारे दोन तास शास्त्रकिया करून त्या भटक्या कुत्र्याचा जीव वाचविला. हा भटका कुत्रा आठ वर्षाचा असून खास पुण्याहुन गॅस अनास्थेशीया मागवून त्याच्यावर शास्त्रकिया करण्यात आली.

टॅग्स :kalyanकल्याण