शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

बुल्सकडून वॉरियर्सची शिकार प्रो-कबड्डी : बंगालवर ३१-२५ ने शानदार विजय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2017 01:42 IST

होमग्राऊंडवर विजयी सलामी दिल्यानंतर दोन पराभव आणि एक बरोबरी अशी फारशी चांगली कामगिरी न करणाऱ्या बंगळुरू बुल्सचा प्रो-कबड्डीच्या पाचव्या पर्वात बुधवारी अखेर सूर गवसला.

किशोर बागडे नागपूर : होमग्राऊंडवर विजयी सलामी दिल्यानंतर दोन पराभव आणि एक बरोबरी अशी फारशी चांगली कामगिरी न करणाऱ्या बंगळुरू बुल्सचा प्रो-कबड्डीच्या पाचव्या पर्वात बुधवारी अखेर सूर गवसला. या संघाने विभागीय क्रीडा संकुलात स्थानिक चाहत्यांच्या उत्साहाचा लाभ घेत बंगाल वॉरियर्सवर ३१-२५ अशा फरकाने पराभव केला. सलामीला दोन्ही लढतीत विजय नोंदविणाºया वॉरियर्सचा हा पहिलाच पराभव ठरला.ब गटाच्या या सामन्यात मध्यंतरापर्यंत बुल्सने वॉरियर्सवर १२-१० अशी निसटती आघाडी संपादन केली होती. उत्तरार्धात अजय कुमारच्या उत्कृष्ट चढाईच्या बळावर संघाने गुणांमध्ये चांगलीच भर घातली. युवा आशिष कुमारने त्याला भक्कम साथ देत तब्बल पाच पकडी केल्या. कर्णधार रोहित कुमारने सहा तर महिंदरसिंग आणि रविंदरसिंग यांनीही प्रत्येकी दोन गुणांची भर घालून बुल्सचा विजय निश्चित केला.प्रतिस्पर्धी बंगाल संघाचा कोरियाचा चढाईपटू जँग कून ली याने आठ गुण संपादन केले खरे, पण उत्तरार्धात त्यांचा खेळ ढेपाळल्याने संघाला पराभव पत्करावा लागला. कर्णधार सुरजितसिंग आणि विनोद कुमार यांना गुण खेचून आणण्यात अपयश आले. बुल्सच्या बचावफळीने या दोघांचीही कोंडी केल्याने त्यांना केवळ क्रमश: चार आणि दोनच गुण मिळविता आले. आजच्या विजयानंतर बंगळुरू बुल्स ब गटात सहा सामन्यात तीन विजयांसह अव्वल स्थानावर विराजमान झाला तर पराभूत वॉरियर्स दोन विजय आणि एका पराभवासह तिसऱ्या  स्थानावर आला.