शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

प्रो कबड्डी : पाटणा पायरेट्सचा दमदार विजय, कर्णधार प्रदीपचा एकहाती दबदबा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2017 02:47 IST

सलग दुस-या सामन्यात कर्णधार प्रदीप नरवालने केलेल्या झंझावाती आक्रमणाच्या जोरावर गतविजेत्या पाटणा पायरेट्सने दुसºया विजयाची नोंद करताना तेलुगू टायटन्सचा ४३-३६ असा धुव्वा उडवला.

हैदराबाद : सलग दुस-या सामन्यात कर्णधार प्रदीप नरवालने केलेल्या झंझावाती आक्रमणाच्या जोरावर गतविजेत्या पाटणा पायरेट्सने दुसºया विजयाची नोंद करताना तेलुगू टायटन्सचा ४३-३६ असा धुव्वा उडवला. सलग पाचव्या सामन्यात तेलुगूला पराभवाचा सामना करावा लागला.पाटणाने तुफान आक्रमक खेळ करताना सामना एकतर्फी केला. मध्यंतरालाच पाटणाने २६-१६ अशी दहा गुणांची मजबूत आघाडी घेत सामना पूर्णपणे आपल्या बाजूने झुकविला. प्रदीपने निर्णायक चढाई करताना १२ गुणांची वसुली करत तेलुगूच्या आव्हानातली हवा काढली. तसेच, मोनू गोयतनेही आक्रमणात १० गुण मिळवताना प्रदीपला चांगली साथ दिली. विनोद कुमार व जयदीप यांनी बचावामध्ये प्रत्येकी ४ गुण घेत तेलुगूच्या चढाईपटूंच्या दमदार पकडी केल्या. कर्णधार राहुल चौधरीची झुंज अपयशी ठरली. एकूण १२ गुण मिळवले. अनुभवी राकेश कुमारनेही अष्टपैलू खेळ करताना ६ गुण कमावले. (वृत्तसंस्था)