शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
3
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
4
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
5
इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
6
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
7
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
8
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
9
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
10
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
11
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
12
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
13
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
14
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
15
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
16
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
17
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
18
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
19
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
20
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
Daily Top 2Weekly Top 5

प्रो कबड्डी : हरियाणाने हिसकावला गुजरातचा विजय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2017 01:27 IST

अत्यंत अटीतटीच्या झालेल्या लढतीत झुंजार खेळ करताना हरियाणा स्टीलर्स संघाने गुजरात फॉर्च्युनजायंट्स संघाला २७-२७ असे बरोबरीत रोखले.

हैदराबाद : अत्यंत अटीतटीच्या झालेल्या लढतीत झुंजार खेळ करताना हरियाणा स्टीलर्स संघाने गुजरात फॉर्च्युनजायंट्स संघाला २७-२७ असे बरोबरीत रोखले. संपूर्ण सामन्यावर वर्चस्व गाजविल्यानंतरही गुजरातला बरोबरीवर समाधान मानावे लागले.गुजरातने आक्रमक सुरुवात करीत हरियाणावर बºयापैकी दडपण आणले; परंतु हरियाणाने बचावावर अधिक भर देताना हळूहळू पुनरागमन केले. मध्यंतराला गुजरातने ११-८ अशी आघाडी राखली होती. पहिल्या सत्राच्या अखेरच्या मिनिटाला हरियाणावर लोणचे संकट होते; परंतु त्यांचा अखेरचा खेळाडू प्रशांत कुमार राय याने २ गुण मिळवताना संघावरील संकट टाळले. गुजरातने २८व्या मिनिटाला हरियाणावर लोण चढवून २०-१३ अशी ७ गुणांची मोठी आघाडी घेतली. परंतु, यानंतर हरियाणाने चपळ खेळ करून सामन्याचे चित्र पालटण्यास सुरुवात केली. ३४व्या मिनिटाला विकास खंडोलाने सुपर रेड करीत हरियाणाची पिछाडी २०-२३ अशी कमी केली. पुढच्याच मिनिटाला गुजरातवर लोण चढवून हरियाणाने २४-२३ अशा आघाडीसह अखेरपर्यंत नियंत्रण राखत गुजरातला बरोबरीत रोखले. विकास खंडोला व सुरेंदर नाडा यांनी अनुक्रमे आक्रमण व बचावात प्रत्येकी ७ गुण घेऊन हरियाणाचा पराभव टाळण्यात मोलाचे योगदान दिले. गुजरातकडून सुकेश हेगडे, सुनील कुमार, परवेश बैनस्वाल व सचिन चांगले खेळले. (वृत्तसंस्था)तेलगूच्या पराभवाची हॅट्ट्रिक...पराभवाच्या गर्तेत सापडलेल्या तेलगू टायटन्सला कामगिरी उंचावण्यात आलेल्या अपयशामुळे यंदाच्या सत्रात सलग तिसºया पराभवाला सामोरे जावे लागले. मनिंदरसिंगचा तुफानी अष्टपैलू खेळ आणि कोरियन स्टार जँग कुन ली याच्या आक्रमक चढाया या जोरावर बंगाल वॉरियर्सने विजयी सुरुवात करताना बलाढ्य तेलगूला ३०-२४ असा धक्का दिला.