शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

'प्रो कबड्डी'ला आव्हान देण्यासाठी माजी खेळाडूंनी मोट बांधली; लवकरच नवी लीग भेटीला

By स्वदेश घाणेकर | Updated: September 20, 2018 08:21 IST

प्रो कबड्डीमुळे घराघरात पोहोचलेल्या कबड्डीला ग्रहण लागण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. भारतीय हौशी  कबड्डी महासंघाच्या मनमानी कारभाराविरोधात न्यायलयात धाव घेणाऱ्या सदस्यांनी आता प्रो कबड्डीला लक्ष्य केले आहे.

मुंबई - प्रो कबड्डीमुळे घराघरात पोहोचलेल्या कबड्डीला ग्रहण लागण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. भारतीय हौशी  कबड्डी महासंघाच्या मनमानी कारभाराविरोधात न्यायलयात धाव घेणाऱ्या सदस्यांनी आता प्रो कबड्डीला लक्ष्य केले आहे. यशाची शिखरे चढत असलेल्या प्रो कबड्डीला आव्हान देण्यासाठी माजी दिग्गज खेळाडूंनी मोट बांधली आहे. या खेळाडूंनी स्थापन केलेल्या नवीन भारतीय कबड्डी फेडरेशनने प्रो लीगच्या धर्तीवर नवीन लीगची नुकतीच घोषणा केली. 'इंडो इंटरनॅशनल प्रीमिअर कबड्डी लीग' असे या लीगचे नाव आहे. 

आशियाई स्पर्धेतील कबड्डी संघ निवडताना मोठ्याप्रमाणावर पक्षपातीपाणा झाल्याचा दावा करण्यात येत होता. त्याविरोधात काही माजी खेळाडूनी न्यायलयाचे दार ठोठावले. हा मुद्दा ताजा असताना या नव्या लीगची घोषणा म्हणजे जनार्दन गेहेलोत यांची कोंडी करण्याचा प्रयत्न असल्याचे कबड्डी वर्तुळात बोलले जात आहे. भारतीय महासंघावर गेहलोत यांच्या कुटुंबाचेच वर्चस्व जाणवत आहे आणि त्याला आता विरोध होऊ लागला आहे. 

भारताचे दिग्गज आणि अर्जुन पुरस्कार प्राप्त खेळाडूनी एकत्र येउन न्यू कबड्डी फेडरेशन ऑफ इंडियाची स्थापना केली आहे. त्यांच्याच महासंघाने 'इंडो इंटरनॅशनल प्रीमिअर कबड्डी लीग'ची घोषणा केली आहे. यामध्ये आशियाई स्पर्धेची दोन सुवर्णपदक नावावर असलेले एस राजराथीन, विश्वचषक स्पर्धेतील सुवर्णपदक विजेते सुरेश कुमार,  चार राष्ट्रीय जेतेपद नावावर असलेले मुरुगनाथ, मधुकर यादव व सी होनप्पा अशा अनेक माजी खेळाडून्चा समावेश आहे.  स्पर्धेचे फॉरमॅट८ संघांचा समावेश६२ सामने दीड महिने चालणार स्पर्धाप्रत्येक संघात ३-४ परदेशी खेळाडून्यूझीलंड, पोलंड, अर्जेंटिना, टांझानिया ऑस्ट्रेलिया, नॉर्वे, इंग्लंड, कॅनडा आणि अमेरिका या देशांतील खेळाडूचा सहभागDSPORT वाहिनीवर थेट प्रक्षेपण

पाकिस्तानचे खेळाडूही खेळणार लीग नव्या लीगमध्ये पाकिस्तानचे खेळाडूही खेळणार असल्याची घोषणा आयोजकांनी केली आहे. ही घोषणा ते प्रत्यक्षात अमलात कसे उतरवतात हे पाहणे औस्तुक्याचे ठरणार आहे. 

टॅग्स :Pro-Kabaddiप्रो-कबड्डीKabaddiकबड्डी