शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

वीजवापर 30 युनिट असेल तर सावधान, होऊ शकते तपासणी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2021 05:00 IST

महावितरणने कमी युनिट जळत असलेल्या ग्राहकांची तपासणी मोहीम सुरु केली आहे. डिसेंबरच्या शेवटपर्यंत तपासणी पूर्ण करायची आहे. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात १ ते ३० युनिटदरम्यान वापर आहे. अशांची यादी तयार करण्यात येणार आहे. यासाठी महावितरणने विशेष मोहीम आखली आहे. कंपनीचे कर्मचारी अशा ठिकाणी भेट देणार आहेत. मागील काही दिवसापासून महावितरणने थकबाकी वसुल करणे सुरु केले आहे.

 लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : मागील काही दिवसांपासून महावितरणने थकबाकीदार ग्राहकांसह वीजचोरीच्या घटना रोखण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहे. आता तर १ ते ३० युनीटपर्यंत ज्यांचा वापर असेल असे ग्राहकही महावितरणच्या रडारवर आहेत. महावितरण अशा ग्राहकांकडे संशयास्पद समजत असून त्या सर्वांची तपासणी केली जाणार आहे. महावितरणने कमी युनिट जळत असलेल्या ग्राहकांची तपासणी मोहीम सुरु केली आहे. डिसेंबरच्या शेवटपर्यंत तपासणी पूर्ण करायची आहे. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात १ ते ३० युनिटदरम्यान वापर आहे. अशांची यादी तयार करण्यात येणार आहे. यासाठी महावितरणने विशेष मोहीम आखली आहे. कंपनीचे कर्मचारी अशा ठिकाणी भेट देणार आहेत. मागील काही दिवसापासून महावितरणने थकबाकी वसुल करणे सुरु केले आहे. विशेषत: थकबाकी असलेले शासकीय कार्यालय, नळयोजना तसेच पथदिव्यांचीही वीज कट करण्यात येणार आहे.

थकबाकीदार निशाण्यावरजिल्ह्यात मागील काही महिन्यांपासून मोठ्या प्रमाणात थकबाकीदारांची संख्या वाढली आहे. त्यामुळे हे ग्राहकही सध्या महावितरणच्या निशाण्यावर आहे. विशेष म्हणजे, ज्यांची वीज कट केली आहे, त्यांनी परिसरातून कुठून वीज घेतली आहे का, याबाबतची तपासणी केली जात आहे. विशेषत: थकबाकीदारांकडे महावितरणने अधिक लक्ष केंद्रीत केले आहे.

थकीत बिलn चंद्रपूर-गडचिरोली मंडलातील घरगुती ग्राहकांकडे ४९ कोटी ५७ लाख, वाणिज्यिक ग्राहकांकडे १० कोटी ५५ लाख, औद्योगिक ग्राहकांकडे ८ कोटी ८७ लाख, सरकारी कार्यालये व इतर लघुदाब ग्राहकांकडूनही ६ कोटी ५४ लाख येणे ऑक्टोबर महिन्यामध्ये बाकी होते.

चंद्रपूर परिमंडळाकडून विशेष मोहिम राबविण्यात येणार आहे. प्रत्येकांकडे विविध इलेक्ट्रिक साधणे आली आहे. असे असतानाही काही ठिकाणी १ ते ३० युनिट आढळून येत आहे. त्यामुळे अशा ग्राहकांची तपासणी करून कारवाई करण्यात येणार आहे.-सुनील देशपांडे, मुख्य अभियंता  चंद्रपूर परिमंडल

...तर होणार गुन्हा दाखलवीज चोरी करताना पकडल्यास वीज वापर तसेच दंडाची रक्कम भरावी लागणार आहे. जे भरणार नाही त्यांच्यावर महावितरण गुन्हा दाखल करणार आहे. अशा ग्राहकांकडे महावितरणची विशेष नजर असून जिल्ह्यात पथकही गठित करण्यात आलेआहे. 

 

टॅग्स :mahavitaranमहावितरणelectricityवीज