शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

गुजरात जायंट्स संघाचा यु मुम्बावर शानदार विजय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2017 01:05 IST

सांघिक खेळाच्या जोरावर येथील एरिना स्टेडियमवर झालेल्या सामन्यात गुजरात फॉर्च्युन जायंट्सने यु मुम्बाचे आव्हान ३९-२१ असे परतवून लावले. माात्र, मुंबईच्या खेळाडूंना लौकिकास साजेशी कामगिरी करता आली नाही.

- संतोष मोरबाळे अहमदाबाद : सांघिक खेळाच्या जोरावर येथील एरिना स्टेडियमवर झालेल्या सामन्यात गुजरात फॉर्च्युन जायंट्सने यु मुम्बाचे आव्हान ३९-२१ असे परतवून लावले. माात्र, मुंबईच्या खेळाडूंना लौकिकास साजेशी कामगिरी करता आली नाही.आपल्या आक्रमक खेळासाठी प्रसिद्ध असलेल्या यु मुम्बाची सुरुवात अडखळतच झाली. घरच्या मैदानावर खेळत असलेल्या गुजरात फॉर्च्युन जायंट्सने पहिल्या आठ मिनिटांतच मुंबईवर लोण चढविले. स्टार खेळाडू अनुपकुमार व शब्बीर बाबू व नितीन मदने यांच्या चढायांना यश येत नसल्याचे पाहून मुंबईने काशिलिंग आडकेला मैदानात उतरविले. मात्र, तरीही गुजरातने पूर्वार्ध संपण्यापूर्वी मुंबईवर दुसरा लोण चढविला. पूर्वार्धात मुंबईला फक्त सहाच गुण मिळविले.गुजरातने चढाई व पकड या दोन्ही क्षेत्रात चांगली कामगिरी करीत पूर्वार्धात मुंबईवर २०-६ अशी भक्कम आघाडी घेतली होती. कर्णधार सुकेश हेगडे, रोहित गुलिया व सचिनने खोलवर चढाया करीत यु मुम्बाचा बचाव भेदला. मुंबईच्या खेळाडूंना आपली नेहमीची लय सापडत नव्हती. शब्बीरला आज एकाही गुणाची नोंद करता आली नाही. दुसºया सत्रात काशिलिंग अडके याने चांगल्या चढाया करीत संघाला काही गुण मिळवून दिले. मात्र, गुजरातच्या सांघिक खेळापुढे त्याचे प्रयत्न अपुरे पडले. गुजरातच्या अबोझर महोझरमिघानी याने मुंबईच्या खेळाडूंच्या पकडी करीत त्यांचे आव्हान परतवून लावले. मुंबईच्या प्रमुख खेळाडूंना बहुतांश वेळ मैदानाबाहेरच राहावे लागले याचा परिणाम त्यांच्या खेळावर झाला. सामना संपण्यास शेवटची काही मिनिटे बाकी असताना गुजरातने मुंबईवर तिसरा लोण चढवित विजयी ३७-२१ आघाडी घेतली.