शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

ऊर्जा संतुलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2018 00:01 IST

जेव्हा आपण निसर्गाने बनविलेल्या भौतिक नियमांकडे पाहतो, तेव्हा असे लक्षात येते की प्रत्येक ठिकाणी ऊर्जेचे संतुलन आहे.

डॉ. भूषण कुमार उपाध्यायऊर्जा या सृष्टीचे मूळ आहे. या ऊर्जेमुळेच सृष्टीतील सर्व क्रिया संचलित होतात. कार्य संचलनासाठी, एक विशिष्ट प्रकारची ऊर्जा एका विशिष्ट परिस्थितीमध्ये लागली पाहिजे. जर ऊर्जेची मात्रा कमी असेल किंवा मात्रा पूर्ण झाल्यानंतरही जर एखाद्या विशिष्ट पद्धतीने त्या ऊर्जेचा वापर झाला नाही, तर कार्य संपादन होऊ शकत नाही.जेव्हा आपण निसर्गाने बनविलेल्या भौतिक नियमांकडे पाहतो, तेव्हा असे लक्षात येते की प्रत्येक ठिकाणी ऊर्जेचे संतुलन आहे. ज्यावेळी ऊर्जेचे संतुलन बिघडते, त्यावेळी उलट-सुलट घडण्यास सुरुवात होते. जसे वायुमंडलामध्ये पंचमहाभूतांचे जे गुणोत्तर आहे, ते एका विशिष्ट ऊर्जा-संतुलनासोबतच पूर्ण होत असते. अनेक नैसर्गिक संकटे ही निसर्गाचे संतुलन बिघडल्यामुळे येतात.मानवी शरीर ही या निसर्गाची सर्वात उत्तम रचना आहे. या मानवी शरीरात निसर्गाचे सर्व नियम नियमित काम करतात. ऊर्जा संतुलनाचा सिद्धांत या मानवी शरीरालाही पूर्णत: लागू होतो. यामुळेच चिकित्सा-शास्त्रानुसार शरीरात ज्या क्रि या संचलित होतात व जे तत्त्व दिसून येतात, ते तत्त्व एका विशिष्ट गुणोत्तरात दिसून येतात. म्हणूनच शारीरिक व जैविक ऊर्जा एका विशिष्ट संतुलनाने मानवी शरीरात काम करीत असते. जसे- रक्तदाबाचे संतुलन १२०-८० व रक्तातील साखर १००-१४० असली पाहीजे. जेव्हा हे संतुलन बिघडते, तेव्हा आजार होतात. चिकित्सा-शास्त्रज्ञांच्या मते- शरीराचा प्रत्येक अणू व परमाणू या संतुलनासोबतच काम करतो. शारीरिक व मानसिकदृष्ट्या निरोगी व्यक्तीसाठी ऊर्जेचे हे संतुलन आवश्यक आहे.मानवी- शरीराचे ऊर्जा संतुलन राखण्यासाठी विचार, वाणी व कर्माचे खूप मोठे योगदान आहे. तज्ज्ञांच्या मते- विकासातील सर्वात मोठी ऊर्जा आपल्या विचारात सामावलेली आहे. विचार हे वाणी व कर्माचे जनक आहे. म्हणूनच सकारात्मक विचार ऊर्जेचे संतुलन दृढ करते, तर नकारात्मक विचार त्या ऊर्जेचे संतुलन बिघडवते. अशाप्रकारे वाणीसुद्धा आपल्या ऊर्जेच्या संतुलनाला बऱ्याचअंशी प्रभावित करीत असते. शुद्ध व चांगली वाणी ऊर्जा संतुलनाला मजबूत करते. अशाप्रकारे आपले सत्कर्म, जीवन व शरीराचे ऊर्जा-संतुलन राखून ठेवते. म्हणूनच शारीरिक व मानिसक आरोग्यासाठी चांगले विचार, शुद्ध वाणी व सत्कर्म आवश्यक आहे.

टॅग्स :spiritualअध्यात्मिक