शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

लॉकडाऊनमध्ये चहा विकणाऱ्या महिलेच्या पडला प्रेमात, हनीमूनसाठी विकली जमीन आणि मग...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2022 17:35 IST

Madhya Pradesh : हे इतक्यावरच संपलं नाही. या व्यक्तीला सर्वात मोठा धक्का तेव्हा बसला जेव्हा त्याला समजलं की, महिला आधीच विवाहित आहे आणि तिला मुलंही आहेत.

Madhya Pradesh : एक व्यक्ती चहाची टपरी चालवणाऱ्या महिलेच्या प्रेमात पडला आणि मग दोघांनी कोर्ट मॅरेज केलं. नंतर समाजाला दाखवण्यासाठी लाखो रूपये खर्च करून लग्नही केलं. पण त्यानंतर जे झालं ते अजून अवाक् करणारं होतं. हनीमूनसाठी त्याने जमीन विकली आणि मग दागिने आणि रक्कम घेऊन महिला फरार झाली. हे इतक्यावरच संपलं नाही. या व्यक्तीला सर्वात मोठा धक्का तेव्हा बसला जेव्हा त्याला समजलं की, महिला आधीच विवाहित आहे आणि तिला मुलंही आहेत.

मीडिया रिपोर्टनुसार, 'लुटेरी दुल्हन'ची ही शिकार मध्य प्रदेशच्या छतरपूर जिल्ह्यातील आहे. पीडित व्यक्तीने एसपी ऑफिसमध्ये पोहोचून घडलेल्या सर्व प्रकाराची लिखित माहिती दिली. तक्रारीत तो म्हणाला की, त्याची पत्नी लाखो रूपये रक्कम आणि दागिने घेऊन फरार झाली. आता ती परत येण्याचं नावंही घेत नाहीये.

लॉकडाऊनमध्ये पडला होता तिच्या प्रेमात

पीडित तरूणाने सांगितलं की, २ वर्षाआधी लॉकडाऊन दरम्यान तो उषा पाल नावाच्या महिलेच्या प्रेमात पडला होता. महिला रेल्वे स्टेशन बाहेर चहाचं दुकान लावत होती. तो तिथे सकाळी फिरायला जात होता तेव्हा दोघांमध्ये ओळख झाली. नंतर दोघे प्रेमात पडले. काही वर्ष अफेअर चाललं आणि त्यानंतर दोघांनी लग्नाचा निर्णय घेतला. काही महिन्यांपूर्वी दोघांनी कोर्ट मॅरेज केलं.

दागिने आणि कॅश घेऊन नवरी फरार

लग्न झाल्यावर काही दिवस सगळं काही ठीक सुरू होतं. पण पत्नीने दागिन्यांची मागणी केली. सोन्याची चेन, कानातले आणि काही इतर दागिने त्याने तिला घेऊन दिले. बॅंक अकाउंटमध्ये दोन लाख रूपये ठेवले होते. तेही तो घरी घेऊन आला. नंतर एक दिवस पत्नीने पतीला बाजारातून काही सामान आणण्यास सांगितलं. जेव्हा पती घरी आला तेव्हा पत्नी घरी नव्हती. ती दोन लाख रूपये कॅश आणि दागिने घेऊन फरार झाली.

विवाहित आणि मुलांची आई होती महिला

आता पत्नी ना त्याच्याकडे परत आहे ना पैसे आणि दागिने परत देत आहेत. पीडित व्यक्तीने सांगितलं की, त्याला काही दिवसांपूर्वी समजलं की, त्याची पत्नी विवाहित आहे आणि तिला मुलंही आहेत. अशात तो हैराण झाला आहे. 

टॅग्स :Madhya Pradeshमध्य प्रदेशfraudधोकेबाजी