शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Local Body Elections: २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतीसाठी निवडणूक जाहीर; 'असा' आहे कार्यक्रम, 'दुबार मतदार'ही समजणार
2
दुबार मतदारांच्या नावासमोर 'डबल स्टार' येणार; राज्य निवडणूक आयोगाचं मोठं पाऊल, कशी असेल नवी मोहीम?
3
लग्नात का येताहेत समस्या? कोणत्या सुधारणा आवश्यक? न्यायालयानं स्पष्टच सांगितलं
4
माणुसकीचा जमानाच राहीला नाही! ओला रायडरची मदत केली अन् तो तरुणीसोबत 'असा' वागला
5
अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा शिंदेंना धक्का, रायगडमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेशी आघाडी
6
महादेव बेटिंग अ‍ॅप प्रकरणातील मुख्य आरोपी दुबईतून बेपत्ता, भारताच्या प्रत्यार्पणाच्या आशेला धक्का
7
'या' योजनेत गुंतवणूक केल्यास मिळेल दुहेरी फायदा आणि तगडा परतावा, निवृत्तीनंतरचे टेन्शन होईल 'गायब'!
8
सप्तपदीनंतर दोन तासांत लग्न मोडलं, वधू पक्षाने वराला झोड झोड झोडलं, नेमकं काय घडलं?  
9
कॅनडाने भारतीय विद्यार्थ्यांना दिला मोठा धक्का, ७४% विद्यार्थी व्हिसा अर्ज नाकारले
10
उद्योग जगताला मोठा धक्का! हिंदुजा ग्रुपचे अध्यक्ष गोपीचंद पी. हिंदुजा यांचे लंडनमध्ये निधन
11
चॅटजीपीटी आता तुम्हाला 'या' मुद्द्यांवर सल्ला देणार नाही! कंपनीने का बदलले नियम?
12
'एक गरिबांचा, तर दुसरा श्रीमंतांचा; दोन देश निर्माण केले', राहुल गांधींचा PM मोदींवर निशाणा
13
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किंमतीत मोठी घसरण, Silver ₹३५०० तर Gold किती रुपयांनी झालं स्वस्त?
14
DSP Rishikant Shukla: दहा वर्षांच्या सेवेतच जमवली १०० कोटींची माया; एक दोन नव्हे, तब्बल १२ भूखंड, ११ दुकाने अन्...
15
पत्नीने दिला जुळ्यां मुलांना जन्म, पती म्हणाला, ही माझी मुलंच नाहीत, जोरदार राडा, अखेरीस समोर आलं वेगळंच सत्य
16
बाजारात खळबळ! Hyundai ने ₹७.९० लाखात लाँच केली नवीन 'व्हेन्यू २०२५'; जबरदस्त फीचर्स आणि ADAS सह एंट्री
17
अरे व्वा! पांढरे केस हे वाढलेल्या वयाचं लक्षण नाही, ही तर आहे शरीरासाठी संरक्षण ढाल
18
दीड वर्षांपूर्वीच्या पल्लेदार कौशल हत्येचा पर्दाफाश! बायकोच्या 'डबल गेम'ने पोलीसही हादरले
19
मैदान गाजवले, आता ब्रँड व्हॅल्यूही वाढली! महिला क्रिकेटपटूंच्या कमाईत दुप्पट वाढ; सर्वाधिक फी कोणाची?
20
पाकिस्तानच्या सुप्रीम कोर्टात मोठा स्फोट! इस्लामाबादमध्ये खळबळ; बेसमेंटमध्ये झालेल्या ब्लास्टने इमारतीला हादरवले

विराटची दाढी, सचिनचे गाल, युवराजचं नाक ओढण्याची आणि धवनला पोटात गुद्दे घालण्याची हिंमत?..

By admin | Updated: May 3, 2017 15:03 IST

हो, विराटला उचकवण्याची हिंमत असलेली आहे एक व्यक्ती..

 - मयूर पठाडे

 
विराट कोहलीच्या दाढीचे केस उपटायची हिंमत? आहे कोणात? विराटच्या साधं जवळ जायलाही जगभरातले बॉलर तर जाऊ द्या, पण त्यांनी टाकलेले बॉलही घाबरतात. कारण आपण टाकलेल्या बॉलचं काय होईल हे त्या बॉलर्सना आणि बॉललाही माहीत असतं. थोडासाही चुकारपणा केला तर हा माणूस आपल्याला उचलून पटकणार, सीमापार तडाखा देणार किंवा उचलून सरळ बॉऊण्ड्रीवरून बाहेर भिरकावून देणार, हे निश्चित.
आणि विराटचा इतिहासही काही असा प्रेमळ नाही. कुणाचं चुकलं तर त्याला प्रेमानं काही सांगेल, आंजारुन, गोंजारून समजावून सांगेल. छे !
कोणी अरे केलं तर हा कारे करणारच.
 
 
ऑस्ट्रेलियाविरुद्ध नुकत्याच झालेल्या कसोटी सामन्यांच्या मालिकेत स्टिव्ह स्मिथ आणि त्याच्या टीमनं हा अनुभव आणि धडा घेतला.
ही झाली खेळाची गोष्ट, पण पर्सनल बाबतीत ढवळाढवळ? थेट त्याच्या दाढीला हात घालण्याची हिंमत?.
विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांच्या नात्याबाबत जेव्हा सगळीकडून कंड्या पिकत होत्या, तेव्हाही विराट कोहलीनं सगळ्यांना ‘चूप बसा, माझ्या पर्सनल बाबतीत उगाच नाक खुपसू नका’ म्हणून चांगलंच खडसावलं होतं.
पण त्याच्या दाढीला हात घालण्याची हिंमत?
आणि तरीही काहीही करता विराट चक्क हसतोंय! त्याचा आनंदही घेतोय! आपली दाढी खेचणार्‍याचा फोटो स्वत:च शेअरही करतोय?.
सोशल मिडियावर हा फोटो सध्या खूपच व्हायरल आहे.
ऐसे कैसे हो सकता है?
बिलकुल नामुमकिन.
लेकिन ऐसा हुआ है.
नामुमकिन को मुमकिन बनाना विराट की आदत जो है.
पण कोण आहे ही व्यक्ती, जिनं विराटची दाढी खेचण्याची हिंमत केली?
ती व्यक्तीही तशीच हिंमतवान असली पाहिजे.
आहेच ती व्यक्ती हिंमतवान.
कारण तिचाही इतिहास तसाच आहे.
विराट तर तिच्यासाठी ‘बच्चा’ आहे, कारण याआधी तिनं मास्टर ब्लास्टर सचिनचे गाल खेचले आहेत,
 
 
युवराजला डिवचलं आहे. त्याचं नाक ओढलं आहे.
 
 
शिखर धवनच्या पोटावर बसून त्याला गुद्दे मारले आहेत.
 
 
ही हिंमतवान व्यक्ती आहे हिनाया!.
हरभजन सिंगची नऊ महिन्यांची मुलगी!
हरभजन आणि गीता बसरा यांना गेल्या वर्षी जुलैमध्यें लंडनमध्ये मुलगी झाली. तिच ही हिनाया. 
अजून ती वर्षभराचीही झाली नाही तरी तिची ही हिंमत.
मुलाचे पाय पाळण्यात दिसतात ते असे!
हरभजन मैदानावर कितीही संतापी असला तरी जवळपास सगळ्याच क्रिकेटपटूंशी त्याचा याराना आहे. 
सध्या आयपीएलचा दहावा हंगाम सुरू आहे. त्यात हरभजन मुंबई इंडियन्सकडून खेळतो आहे. हे सामने पाहण्यासाठी अर्थातच क्रिकेटपटूंचे कुटुंबियही हजर असतात. मैदानावरचे सामने कितीही अटीतटीचे होत असले तरी क्रिकेटपटूंसाठी त्यांच्या कुटुंबियांतील संवाद आणि भेटी ही त्यातली आनंदाची झुळुक.
आनंदाची ही लहर फुलवण्याचं काम सध्या हिनाया करते आहे.