शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
4
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
5
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
6
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
7
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
8
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
9
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
10
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
11
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
12
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
13
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
14
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
15
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
16
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
17
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
18
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
19
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
20
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
Daily Top 2Weekly Top 5

व्हिडीओ- कपड्यांवरून ठरतो चिमुरड्यांकडे बघण्याचा दृष्टिकोन !

By admin | Updated: July 1, 2016 01:26 IST

मुलांमध्ये श्रीमंती आणि गरिबीवरून भेदभाव केला जातो, याचा हृदयस्पर्शी व्हिडीओ युनिसेफनं प्रसिद्ध केला आहे.

ऑनलाइन लोकमतन्यूयॉर्क, दि. 30- मुलं म्हणजे देवाघरची फुलं असं नेहमीच म्हटलं जातं. लहानग्यांची निरागसता अनेकांना भावते. मात्र अजूनही मुलांमध्ये श्रीमंती आणि गरिबीवरून भेदभाव केला जातो, याचा हृदयस्पर्शी व्हिडीओ युनिसेफनं प्रसिद्ध केला आहे. जॉर्जिया या देशाची राजधानी असलेल्या टबिलीसीच्या रस्त्यावर अनानो नावाची एक 6 वर्षांची गोंडस मुलगी हरवते. अनेक जण रस्त्यावर उभ्या असलेल्या अनानोला तू हरवली आहेत का, तू ठीक आहेस का असे प्रश्न विचारत होते. एका माणसानं तर चक्क मदतीसाठी खिशातून फोनही काढला. मात्र त्याच अनानोचा मेकओव्हर करून तिला घाणेरड्या कपड्यांमध्ये रस्त्यावर उभं केलं असता तिच्याकडे आजूबाजूनं जाणारी माणसं साधी बघतही नव्हती. याचा अनुभव रेस्टॉरन्टमध्ये अनानोला पुन्हा आला. अनानोनं चांगले कपडे घालून एका रेस्टारंटमध्ये प्रवेश केला. त्यावेळी एक महिलेनं तिला जवळ घेऊन चक्क तिची पापी घेतली. दुस-या एका माणसानं तिला पैसे देऊ केले. मात्र तीच अनानो घाणेरडे कपडे घालून रेस्टॉरंटमध्ये आली. तेव्हा ग्राहकांनी तिच्याकडे दुर्लक्ष केलं. काहींनी तर तिला तिथून जायला सांगितलं. एका ग्राहकानं तिथल्या स्टाफला अनानोला रेस्टॉरंटमधून बाहेर काढण्याची विनंती केली. या सर्व प्रकारामुळे 6 वर्षांची चिमुकली अनानो खूपच निराश झाली. "चेह-याला काजळ लावून घाणेरडे कपडे घालून मी जेव्हा त्यांच्यासमोर गेली. त्यावेळी त्यांनी मला जायला सांगितलं. त्यामुळे मी उदास झाली. ते मला का जायला सांगत होते मला माहीत नाही", असं निरागस अनानोनं म्हटलं आहे. अनानोसारखे लाखो चिमुरडे दररोज अशा यातना सहन करत असतात. एका रिपोर्टनुसार गरीब मुलं 5 वर्षांच्या आतच मृत्युमुखी पडत असल्याचंही भीषण वास्तव समोर आलं आहे.