शहरं
Join us  
Trending Stories
1
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
2
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
3
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
4
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
5
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
6
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
7
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
8
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
9
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
10
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
11
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
12
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
13
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
14
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
15
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
16
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
17
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
18
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
19
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
20
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

आजच्या दिवशी महात्मा गांधींनी सुरू केला होता दांडी मार्च

By admin | Updated: March 12, 2016 14:14 IST

86 वर्षांपूर्वी म्हणजे 12 मार्च 1930 रोजी महात्मा गांधींनी दांडी मार्च सुरू केला. ब्रिटिशांनी भारतीयांच्या मिठ बनवण्याच्या व विकण्याच्या हक्कावर बंदी घातली तसेच जबर कर लावला

ऑनलाइन लोकमत
86 वर्षांपूर्वी म्हणजे 12 मार्च 1930 रोजी महात्मा गांधींनी दांडी मार्च सुरू केला. ब्रिटिशांनी  भारतीयांच्या मिठ बनवण्याच्या व विकण्याच्या हक्कावर बंदी घातली तसेच जबर कर लावला आणि महात्मा गांधींनी  सत्याग्रह सुरू करत जनआंदोलन आजच्या दिवशी सुरू केलं.
मिठावरील कराचा सर्वाधिक फटका गरीबांना बसणार होता त्यामुळे सर्वसामान्य भारतीयांना शांततेच्या मार्गाने ब्रिटिशविरोधी आंदोलनात सहभागी करून घेण्यासाठी महात्मा गांधींनी या घटनेचा वापर केला आणि कायदेभंग आंदोलन उभारले. 
साबरमतीहून 78 सहकाऱ्यांसोबत महात्मा गांधींनी 241 मैल दूर असलेल्या दांडी या समुद्रकिनारी वसलेल्या गावाकडे चालायला सुरूवात केली. ज्यावेळी 5 एप्रिलला ते तिथे पोचले त्यावेळी या जनआंदोलनात सहभागी झालेल्यांची संख्या लाखाच्या घरात होती. तिथं मिठ उचलत सत्याग्रहींनी कायदेभंग केला. पोलीसांनी जवळपास 60 हजार सत्याग्रहींना अटक केली. 
21 मे रोजी सरोजिनी नायडू यांनी 2500 सत्याग्रहींसह धरासना मिठागारात सत्याग्रह केला. हे  लोण नंतर पसरत गेलं, ज्याची परिणिती स्वातंत्र्यासाठी देशव्यापी जनआंदोलन उभारण्यात झाली.