शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

या आहेत, रंगीबेरंगी फुलांनी बहरलेल्या गल्ल्या !

By admin | Updated: March 21, 2017 18:40 IST

प्रत्येक शहराची, गावाची किंवा पाड्याची एक खाशीयत असते. ती म्हणजे त्याठिकाणी लाभलेलं नैसर्गिक किंवा मानवनिर्मित उभारलेलं सौंदर्य. अशाच शहरांना भेट देण्यासाठी अनेक पर्यटक उत्साहित असतात.

ऑनलाइन लोकमत
 
मुंबई, दि. 21 - प्रत्येक शहराची, गावाची किंवा पाड्याची एक खासियत असते. ती म्हणजे त्या ठिकाणी लाभलेलं नैसर्गिक किंवा मानवनिर्मित उभारलेलं सौंदर्य. अशाच शहरांना भेट देण्यासाठी अनेक पर्यटक उत्साहीत असतात.
 
अशा पर्यटकांसाठी आम्ही घेऊन आलोय जगातील काही शहरांमधील रंगीबेरंगी फुलांनी बहरलेल्या गल्ल्या. या गल्ल्यातून किंवा शहरांच्या रस्त्यांवरून फेरफटका मारताना नक्कीच येथील सौंदर्य पुन्हा-पुन्हा आकर्षित करण्यासारखं आहे. 
 
 
स्पेलो
इटली - अम्ब्रिया येथील स्पेलो गल्लीतील घरांच्या खिडकी, बाल्कनी आणि रस्त्यांवर सुंदर फुलांनी बहरलेल्या दिसतील. या रंगीबेरंगी फुलांमुळे या शहराची एक वेगळीच ओळख निर्माण झाली आहे.    
 
लोमबार्ड स्ट्रीट
अमेरिका - सॅन फ्रान्सिस्को येथील लोमबार्ड स्ट्रीटवर व्हिक्टोरियन स्टाईलची घरे बनविण्यात आली आहेत. याठिकाणी वसंत ऋतूमध्ये जणू फुलांची बरसातच होते. तसेच या ठिकाणी फेरफटका मारताना फुलांचा दरवळलेला सुगंध अनुभवता येईल. 
 
रुआ गोन्जकले द कार्वाव्हो
ब्राझील - अत्याधुनिक सुविधा असलेले शहर म्हणून ब्राझीलकडे पाहण्यात येत आहे. येथील पोर्टो एलेग्रेमधील रुआ गोन्जकले द कार्वाव्हो रोडवर अनेक झाडे लावली आहे. त्यामुळे 500 मीटरचा रोड झाडांनी व्यापला असल्यामुळे या ठिकाणी वसंत ऋतूमध्ये रोडवर फुलांचा सडा पडलेला असतो.
 
पाउंड स्ट्रीट
ऑस्ट्रेलिया - ग्राफ्टनमधील जॅकरांडा एव्हेन्यू अशा नावाने ओळखला जाणारा रोड फिकट जांभळ्या रंगाच्या फुलांनी सजलेला असतो. देशी-विदेशी पर्यटकांच्या आवडीचा हा रोड समजला जातो.