शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

स्वखर्चाने उभारला विसर्जन घाट

By admin | Updated: September 1, 2014 17:10 IST

येथील कोहजगांव ग्रामस्थांनी एकत्रित येऊन चिंचपाडा येथील तलावावर गणेशविसर्जनासाठी स्वखर्चाने घाट उभारला आहे

पंकज पाटील, अंबरनाथयेथील कोहजगांव ग्रामस्थांनी एकत्रित येऊन चिंचपाडा येथील तलावावर गणेशविसर्जनासाठी स्वखर्चाने घाट उभारला आहे. या ठिकाणी अंबरनाथ पश्चिमेतील बहुसंख्य गणेशमूर्तींचे विसर्जन केले जात असल्याने भाविकांना फायदा होणार आहे. चिंचपाड्यातील तलावाची देखरेख पूर्वीपासून कोहजगावातील ग्रामस्थच करीत आले आहेत. तलाव पात्रात स्वच्छ पाणी असल्याने दरवर्षी अनेक भाविक या ठिकाणी मूर्ती विसर्जनासाठी आणतात. वेगाने नागरीकरण होत असल्याने या परिसरात गृहसंकुले मोठ्या प्रमाणात तयार झाली आहेत. त्यामुळे या ठिकाणी गणेशविसर्जन करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. याआधी येथील भाविकांना विसर्जनापूर्वी आरती करण्यासाठी कट्टा नसल्याने चिखलातच किंवा एखाद्या खडकावर मूर्ती ठेवून आरती करावी लागत होती. तसेच तलावाकडील मार्गावर चिखल तुडवतच भाविकांना विसर्जन करावे लागत होते. भाविकांची ही समस्या लक्षात घेऊन बांधकाम सभापती प्रदीप पाटील यांनी रामदास पाटील, अरुण पाटील, उमेश पाटील, सुरेंद्र पाटील आणि इतर काही ग्रामस्थांना विश्वासात घेऊन येथे ग्रामस्थांच्या स्वखर्चाने गणेशघाट उभारण्याचे काम केले आहे. इतकेच नव्हे तर संपूर्ण परिसराचे सपाटीकरण करून तिथे वाहने उभी करण्यासाठी मोकळी जागा तयार केली आहे. हा परिसर वनखात्याच्या अखत्यारीत असल्याने येथे कोणत्याही प्रकारचे बांधकाम करता येत नाही. मात्र गणेशभक्तांसाठी ही सोय असल्याने त्या कामाचे स्वागत आता परिसरातील नागरिक करीत आहेत. या तलावाच्या परिसरात मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करून हा परिसर हरित करण्याचा प्रयत्नही ग्रामस्थांनी सुरू केला आहे. हे काम करीत असताना विसर्जन घाटाकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था झाल्याने हा रस्ताही गावकऱ्यांनी स्वखर्चाने दुरुस्त केला आहे.