नेल्लोर (आंध्रप्रदेश) : क्रिकेट महानायक आणि राज्यसभा सदस्य सचिन तेंडुलकरने आंध्रप्रदेशच्या नेल्लूर जिल्ह्णातील पुट्टमराजूवारी कंद्रिका हे गाव दत्तक घेतले आहे़रविवारी सकाळी ९ च्या सुमारास सचिन गावात पोहोचला़ गावकऱ्यांनी जल्लोषात स्वागत केले़ यावेळी सचिनने उपस्थितांना मुलगा-मुलगी एकसमान असल्याचे सांगत गावकऱ्यांनी मद्यपान आणि तंबाखू अशा जीवघेण्या व्यसनांपासून दूर राहण्याचे आवाहन केले़खासदार आदर्श ग्राम योजनेंतर्गत खासदार सचिनने पुट्टमराजूवारी कंद्रिका हे गाव दत्तक घेतले़याठिकाणी त्याच्याहस्ते २़७९ कोटी रूपये खर्च अपेक्षित असलेल्या विकास कामांचे भूमिपूजन पार पडले़ पुट्टमराजूवारी कंद्रिका हे ५ हजार लोकसंख्येचे गाव आहे़ हे गाव तिरुपती लोकसभा मतदारसंघांतर्गत येते़ गावातील सुमारे ८० टक्के लोकसंख्या निरक्षर आहे़ शेती आणि दुग्ध उत्पादन हे येथील लोकांचे मुख्य उदरनिर्वाहाचे साधन आहे़दरम्यान, गाव दत्तक घेण्याच्या सचिनच्या कार्याची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही दखल घेत, त्याची प्रशंसा केली़ (वृत्तसंस्था)
सचिनने आंध्रातील गाव घेतले दत्तक
By admin | Updated: November 17, 2014 03:11 IST