शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
3
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
4
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
5
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
6
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
7
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
8
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
9
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
10
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
11
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
12
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
13
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
14
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
15
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
16
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
17
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
18
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
19
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
20
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
Daily Top 2Weekly Top 5

केवळ ११८ रूपयांना विकत मिळेल २६ कोटींचे हॉटेल; फक्त मालकाची १ अट पूर्ण करावी लागणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2025 18:06 IST

पेमैनला हे हॉटेल एक उत्तम ठिकाण बनवायचे होते. त्याला इथं लग्नाचे ठिकाण, रेस्टॉरंट, नाईट क्लब आणि कॅफे बनवायचे होते. पण आता त्याच्याकडील पैसे संपले आहेत.

तब्बल २६ कोटींचे हॉटेल केवळ ११८ रूपयांत कुणीही खरेदी करू शकते, हे ऐकल्यावर तुम्हीही विश्वास ठेवणार नाही. इंग्लंडच्या केटरिंग शहरात १४७ वर्ष जुने रॉयल हॉटेलचा लिलाव होणार आहे. प्रॉपर्टी डेवलपर नाइम पेमैन यांनी २०२० साली २६ कोटी रूपयात हे खरेदी केले होते. त्यांनी या हॉटेलवर ३८ कोटी रुपये खर्च केले आहेत. 

नाइम यांनी हॉटेलच्या रेस्टोरंटवर १२ कोटी रुपये खर्च केलेत. इतका पैसा खर्च करूनही त्याचे काम पूर्ण झाले नाही. नाइम पेमैन यांच्याकडे आता पैसे शिल्लक नाहीत. त्यामुळे त्यांनी कुठल्याही रिजर्व दराशिवाय केवळ १ पाऊंड म्हणजे भारतीय चलनात ११८ रुपये लिलाव किंमत ठेवली आहे. परंतु हे हॉटेल खरेदी करणाऱ्यांसाठी एक अट आहे. त्यांना हॉटेलचं अर्धवट राहिलेले काम पूर्ण करण्यासाठी आणखी १२ कोटी खर्च करावे लागतील. या हॉटेलचा लिलाव ३१ जुलै रोजी होणार आहे.

काय होता पेमैनचा प्लॅन?

पेमैनला हे हॉटेल एक उत्तम ठिकाण बनवायचे होते. त्याला इथं लग्नाचे ठिकाण, रेस्टॉरंट, नाईट क्लब आणि कॅफे बनवायचे होते. पण आता त्याच्याकडील पैसे संपले आहेत. म्हणूनच तो त्याचे स्वप्न पूर्ण करू शकत नाही. त्यामुळे आता मालमत्ता शोधणाऱ्यांना ही व्हिक्टोरियन इमारत फक्त एक पौंडमध्ये खरेदी करण्याची संधी मिळत आहे.

ऐतिहासिक हॉटेल

या हॉटेलमध्ये ४३ खोल्या आहेत. त्याचा इतिहास १४७ वर्षे जुना आहे. राणी व्हिक्टोरिया आणि चार्ल्स डिकन्स सारख्या सेलिब्रिटींनीही येथे वास्तव्य केले आहे. जर तुम्ही ते खरेदी केले तर तुम्हाला हॉटेलची मुख्य इमारत मिळेल. त्यात एक मोठा बॉलरूम, बिलियर्ड रूम (ज्यामध्ये काचेचा घुमट आहे), एक जुना बार आणि अनेक कार्यक्रम ठिकाणे देखील मिळतील.

का विकायचं आहे?

मी गेल्या एका वर्षात खूप प्रयत्न केले, पण प्रकल्प पूर्ण करण्यासाठी आवश्यक पैसे जमवू शकलो नाही असं पेमैनने सांगितले. एक गुंतवणूकदार ४ मिलियन डॉलर देण्यासाठी तयार होता पण मी त्यास नकार दिला. मात्र त्यानंतर मला हे विकण्याचा खूप कठीण निर्णय घ्यावा लागला. कोणीतरी पुढे येईल जो रॉयल हॉटेलच्या भविष्यासाठी माझे स्वप्न पूर्ण करेल. कोणीतरी ते विकत घ्यावे आणि प्रकल्प पुढे न्यावा, त्याचे अपार्टमेंटमध्ये रूपांतर करू नये असं पेमैनला वाटते.