न्यू हॅम्पशायर (इंग्लड) : जुन्या घरचे सामान नव्या घरी नेणे हे एक तापदायक काम असते. एकाच खेपेमध्ये सगळे सामान न्यायचा घरमालकाचा प्रयत्न हा पादचारी व वाहनचालकांसाठी धोकादायक ठरण्याची शक्यता असते दिसताच पोलिसांनी त्याला दंड ठोठावलाच व त्याची कारही उचलून नेली. या घरमालकाने आपल्या कारवर एवढे सामान ठेवले की कारची उंची दुपट्ट झाली. या सामानात सायकल, टेलिव्हीजन, सामान ठेवण्याचे रॅक, फावडे इत्यादी होते. काही लोकांनी पोलिसांना अशी कार जात असल्याचे कळवल्यावर त्यांनी ५७ वर्षांच्या व्यक्तिला न्यू इंग्लडमधील मुख्य महामार्गांपैकी एकावर थांबवले. त्याआधी न्यू हॅम्पशायर स्टेट पोलिसांनी फेसबुक पोस्टमध्ये या कारचा फोटो अपलोड केला होता. ‘‘तुमच्या वाहनाला अडकवलेल्या, त्यावर ठेवलेल्या सामानाचा तुम्हा स्वत:ला आणि तुमच्या वाहनाजवळून जाणाऱ्या वाहनांना भयंकर स्वरुपाचा धोका होऊ शकतो. या सामानामुळे तुम्हाला वाहन चालवताना स्पष्ट दिसणार नाही, कदाचित अपघात होईल. कृपया, आमचे रस्ते सुरक्षित ठेवा,’’ असे म्हटले होते.
वाहतुकीचे नियम पाळण्याचा पोलिसांनी शिकवला धडा, फेसबुकवर फोटो केला पोस्ट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2017 01:03 IST