शहरं
Join us  
Trending Stories
1
' भारतीय अपमान सहन करीत नाहीत, अमेरिकेच्या दबावापुढे भारत कधीच झुकणार नाही' : पुतिन
2
आजचे राशीभविष्य- ४ ऑक्टोबर २०२५: पैशांच्या गुंतवणुकीवर लक्ष द्या, कमी वेळात जास्त लाभ घेण्याची लालसा सोडा
3
...तर पाकिस्तान जागतिक नकाशावर दिसणार नाही! भारतीय लष्करप्रमुखांनी खडसावले 
4
अमेरिकी रस्त्यावर भारतीय बाइक्सने अभिमान वाटतो; राहुल यांनी अमेरिकेत केला भारतीय कंपन्यांचा गौरव
5
लेह हिंसाचार : सोनम वांगचुक यांना अटक; न्याय मागण्यासाठी पत्नी कोर्टात
6
‘बाबा’ विद्यार्थिनींना रात्री खोलीत येण्यास भाग पाडायचा; मिळाली १४ दिवस कोठडी
7
आता सौरऊर्जेवर चालणारी ई-बुलेट आली; ऊर्जाबचत, प्रदूषण नियंत्रणासाठी मोठा फायदा
8
नवी मुंबई विमानतळास दि. बा. पाटील यांचेच नाव; नामकरणासाठी पंतप्रधान मोदी सकारात्मक : मुख्यमंत्री 
9
अमेरिकेच्या टॅरिफ संकटात भारतासह युरोपियन देशांची भूमिका मोलाची; स्वेन ओस्टबर्ग यांचे मत
10
संपादकीय : आता खरी लढाई! मेळावे झाले, घोषणा झाल्या... आता सीमोल्लंघन कधी?
11
पाणंद रस्ते मोकळे करा,  तरच मिळेल सरकारी लाभ; प्रस्ताव विचाराधीन
12
सोमवारपासून परतीच्या सरी; चक्रीवादळ 'शक्ती'मुळे महाराष्ट्रात पुन्हा पाऊस? हवामान खात्याचा नेमका अंदाज काय?
13
डोनाल्ड ट्रम्प आता सिनेमावाल्यांवर का भडकले?
14
मनोज जरांगेंचा १९९४ च्या जी. आर. विरोधात एल्गार! 'या' दोन मोठ्या जातींच्या आरक्षणावर बोलले
15
पाकिस्तानवर हसावं की रडावं.... आता म्हणे मोहसीन नक्वीला गोल्ड मेडल देणार, सन्मान करणार !
16
लाखोंच्या गर्दीत हरवलेला 'मुन्ना' काही मिनिटांत 'अण्णा'च्या गळ्यात; बापलेकांची भावनिक भेट
17
सानिया मिर्झाशी घटस्फोट, आता शोएब मलिकचे सना जावेदशीही लग्न तुटणार? VIDEO मुळे उडाली खळबळ
18
ट्रॅक्टरमध्ये बसून थेट बांधावर... सोलापूरच्या अधिकाऱ्यांची तत्परता, शेतकऱ्यांना दिला धीर
19
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
20
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश

7 रुपयांच्या चहासाठीही 'पेटीएम करो' !

By admin | Updated: November 13, 2016 16:33 IST

दिल्लीतल्या एका चहावाल्यानं मोदींच्या या निर्णयाला पाठिंबा दर्शवत स्वतःच्या ग्राहकांसाठी पेटीएमची सुविधा उपलब्ध करून दिली आहे.

ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. 13 - 500 आणि 1000 रुपयांच्या नोटबंदीच्या केंद्राच्या निर्णयाचं अनेकांनी स्वागत केलं. तर काहींनी मोदींच्या या निर्णयावर टीकासुद्धा केली आहे. खात्यात पैसे असूनही अनेकांना बँकेच्या बाहेर पैसे बदलून घेण्यासाठी तासनतास रांगेत ताटकळत राहावं लागत असल्यानं लोकांमध्ये तीव्र नाराजी आहे. मात्र दिल्लीतल्या एका चहावाल्यानं मोदींच्या या निर्णयाला पाठिंबा दर्शवत स्वतःच्या ग्राहकांसाठी पेटीएमची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे दिल्लीत हा चहावाला सध्या चर्चेत आहे. या चहाविक्रेत्याचं नाव मोनू असून, तो आर. के. पुरम सेक्टरमध्ये चहाचा व्यवसाय करतो. मोनूनं नेहमीच्या व्यवसायासाठी पेटीएमद्वारे ऑनलाइन पेमेंट करण्याची सुविधा उपलब्ध करून दिल्यानं ग्राहकांची सुट्टे पैसे देण्याच्या त्रासातून सुटका झाली आहे. मोनूनं पेटीएमची व्यवस्था केल्यानं ग्राहकही या सुविधेचा लाभ घेत असून, मोदींच्या नोटबंदीच्या निर्णयाचं समर्थन करत आहेत. मोनू म्हणाला, "मी हल्लीच पेटीएमची सुविधा वापरू लागलो आहे. ग्राहकांना चहासाठी सुट्टे पैसे देण्यातून सुटका होण्यासाठी मी हे पाऊल उचललं आहे. तसेच ही सुविधा उपलब्ध करून दिल्यापासून माझ्या ग्राहकांमध्ये सातत्यानं वाढ होत आहे. 7 रुपयांहूनही कमी पैसे असले तरी माणुसकीच्या नात्यातून पेटीएमच्या माध्यमातून मी ते स्वीकारत आहे." दरम्यान मोनूचे ग्राहकही चहावाला डिजिटल झाल्यानं अत्यंत खूश झाले आहेत. एक ग्राहक या निर्णयाचं स्वागत करताना म्हणाला की, चहावाला पेटीएम वापरत असल्यानं आमच्यासाठी ते फायदेशीर ठरत आहे. सुट्टे पैसे खिशात नसताना ही पेटीएमची सुविधा लोकांसाठी फार सोयीस्कर ठरत आहे. मोनूनं पेटीएमची सुविधा उपलब्ध करून दिल्यानं ग्राहकही केंद्र सरकारच्या 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा बंद करण्याच्या निर्णयाचा सकारात्मकरीत्या विचार करत आहेत. गेल्या आठवड्यात अचानक मोदींनी ही घोषणा केल्यानंतर लोकांची एकच तारांबळ उडाली होती. मात्र एका चहावाल्यानं ऑनलाइन पेमेंटची व्यवस्था करून दिल्यानं अनेकांसाठी त्याचा तो निर्णय प्रेरणादायी ठरत आहे.