शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट निवडणुकीचा निकाल लागताच राज ठाकरे वर्षा निवासस्थानी; CM देवेंद्र फडणवीसांची घेतली भेट
2
"आपलं टार्गेट चीन, तर भारताच्या रुपाने...!", निक्की हेली यांनी ट्रम्प प्रशासनाला फटकारलं; स्पष्टच बोलल्या
3
भारत अमेरिकेला आणखी एक झटका देण्याच्या तयारीत; कच्च्या तेलानंतर रशियासोबत करू शकतो ‘ही’ डील
4
बेस्ट निवडणूक २०२५: ठाकरे बंधूंच्या सपशेल पराभवावर CM फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
5
Stock Market Today: शेअर बाजाराची मजबूत सुरुवात, Nifty २५,१०० च्या वर; NBFCs, रियल्टी शेअर्समध्ये तेजी
6
डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफवर रामबाण तोडगा सापडला, हे मित्र बनणार भारतासाठी ढाल
7
सत्काराच्या शालीने वकिलाचा न्यायालयातच गळफास; खिशात चिठ्ठी, पण पोलिसांनी माहिती दडवली
8
मृत्यूच्या खाईत सौंदर्याचा सशक्त आवाज; पॅलेस्टाइनची तरुणी यंदा 'मिस युनिव्हर्स'मध्ये...
9
अदानींनी परदेशी बँकांकडून घेतलं 24000000000 रुपयांचं कर्ज! जाणून घ्या, एवढ्या मोठ्या रकमेचं काय करणार? किती व्याज लागणार? 
10
शाहरुखचा लेक त्याचाच डुप्लिकेट! लूक अन् आवाज सगळंच सेम, पहिल्यांदाच आला प्रेक्षकांसमोर, म्हणाला...
11
तीन विधेयकांवरून तुफान गोंधळ; विराेधकांनी प्रती फाडल्या, विधेयके संयुक्त समितीकडे पाठविली
12
अक्षय कुमार, अर्शद वारसी हाजिर हो..! दिवाणी न्यायालयात प्रकरण दाखल; कारण काय?
13
'त्याला मीच मारलं पण तो कोण होता?'; दहावीच्या विद्यार्थ्याची हत्या करणाऱ्या मुलाची धक्कादायक चॅटिंग समोर
14
आजचे राशीभविष्य, २१ ऑगस्ट २०२५: स्वाभिमान दुखावला जाऊ शकतो; स्त्री वर्गाकडून विशेष लाभ
15
विशेष लेख: चोरी ती चोरीच आणि वरून शिरजोरी? निवडणूक आयोगाने किती सांगितले अन् किती लपवले...
16
“वराह जयंती साजरी करण्याची मागणी म्हणजे तरुणांचे लक्ष दुसरीकडे वळवण्याचा अजेंडा”: सपकाळ
17
पर्युषण पर्वात कत्तलखाने १० दिवस बंद ठेवण्याच्या मागणीला कायदेशीर आधार काय? - उच्च न्यायालय
18
घरांच्या किमतींपेक्षा भाडे जास्त वेगाने वाढते आहे.... महानगरांतली वाढ तर चक्रावून टाकणारी !
19
मोनो ‘ओव्हरलोड’ झाल्यास थांबणार! अधिक प्रवासी झाल्यास गाडी पुढे न सोडण्याचा निर्णय
20
आजचा अग्रलेख: मनमानी आणि कंत्राटदारधार्जिणे निर्णय रोखून खाबूगिरीला चाप बसावा, म्हणून...

पापड, शेवया बनवण्यासाठी गृहिणींची लगबग

By admin | Updated: May 26, 2014 02:29 IST

उन्हाळा संपण्यापूर्वी गृहिणींची लगबग सुरु असते ती पावसाळयाच्या बेगमीसाठी. विविध खादयपदार्थासह पापड, शेवया, वेफर्स आदींच्या तयारीत सध्या महिला गुंतल्याचे चित्र आहे.

अर्जुन चिमटे, वागळे इस्टेट - उन्हाळा संपण्यापूर्वी गृहिणींची लगबग सुरु असते ती पावसाळयाच्या बेगमीसाठी. विविध खादयपदार्थासह पापड, शेवया, वेफर्स आदींच्या तयारीत सध्या महिला गुंतल्याचे चित्र आहे. काही ठिकाणी गल्ली बोळात एकमेका सहाय करु.. या उक्ती प्रमाणे शेजारी पाजारी एकत्र येऊन असे पदार्थ तयार करण्याकडे महिलांचा अधिक कल दिसून येत आहे. उन्हाळा तापायाला लागल्याने घराघरात पापड, कुरडया, शेवया, वेफर्स, चकल्या, वडे आदी खादयपदार्थ तयार करण्याचे घाट घरा-घरात घातले जात आहेत. एकेकाळी संयुक्त कुटुंबामुळे एकाच घरातल्या अनेक स्त्रिया या पदार्थांची निर्मिती सहज करीत असत. परंतु विभक्त कुटुंब पद्धतीमुळे आता सोसायटी अथवा परिसरातील स्त्रीया एकमेकींच्या मदतीने या पदार्थांची निर्मिती करीत असतात. हे पदार्थ तयार आणण्याकडे नौकरदार महिलांचा कल आहे. तर गृहिणी असलेल्या महिला मात्र, आजही हे पदार्थ घरी करतात. त्यासाठी उडदाची डाळ, कुरडयांचे गहू, तसेच नागली, साबुदाणा, ज्वारी, पोहे या पापडासाठी लागणार्‍या पदार्थांची सगळ््यांची मिळून घावूक खरेदीही केली जाते. आज-काल यंत्राणे शेवया आणि पापड तयार करून दिले जातात. त्याचाही आधार बर्‍याच गृहिणींकडून घेतला जातो. हे सर्वच पदार्थ करणे हे अत्यंत जिकीरीचे काम असल्याने शक्यतो ते तयार करवून घेणे किंवा रेडीमेड वापरणे याला मोठ्या प्रमाणावर प्राधान्य दिले असले तरी अनेक घरात त्यांचे घाट आजही घातले जात आहेत. असेच शेवयांच्याबाबतही आहे. पाटाच्या शेवया आणि हाताच्या शेवया असे त्याचे दोन प्रकार या पैकी हाताच्या शेवया ब्राह्मण समाजात तर पाटाच्या शेवया मराठा समाजात प्रचलित आहेत. त्याचेही घाट घातले जात आहेत. या शिवाय भाजीत वापरले जाणारे केवळ हरबर्‍याच्या अथवा मुगाच्या किंवा मिक्स वड्यांचेही घाणे घातले जात आहेत. ज्वारी, नागली, साबुदाणा, बटाटा याचे पळी पापड अनेक ठिकाणी गच्चीत घातले जात आहेत. कुठे-कुठे साबुदाणा आणि बटाट्याच्या चकल्याही पहायला मिळतात. शेवयांसाठी एमपी सिहोर आणि सुपर लोकवन या गव्हांना अधिक पसंती दिली जाते आहे. तर पापडासाठी जुना बटाटा वापरला जातो आहे. याशिवाय ताकात भिजवलेल्या पोपटी मसाला मिरच्या अनेक घरांच्या छतांवर दिसत आहेत. तर कुठे-कुठे आमरसाच्या पोळ््यांची ताटेही बालकनीत अथवा ग्रिलमध्ये पहायला मिळतात. (वार्ताहर)