अकोले (अहमदनगर) : गटारी अमावस्येच्या दिवशी मोठ्या प्रमाणात दारूविक्री होते़ दारू पिऊ नये, हा संदेश देण्यासाठी अहमदनगर जिल्हा दारूबंदी आंदोलनकडून जिल्ह्यात शुक्रवारी संध्याकाळी ठिकठिकाणी दूध विक्री केंद्र उभारून गांधीगिरी करीत दारूला विरोध करण्यात येईल.गटारी अमावस्या १४ आॅगस्टला आल्याने स्वातंत्र्य दिनाची पूर्वसंध्या दारू पिऊन कलंकित करू नये. ‘द दारूचा नव्हे, तर द दुधाचा’ अशी नवी बाराखडी आता आचरणात आणावी यासाठी हे अभिनव आंदोलन करण्यात येत आहे़ अकोले, राजूर, श्रीगोंदा, राहुरी, शेवगाव, संगमनेर, अहमदनगर, पारनेर येथे ५ रुपये ग्लास या दराने दूध विक्री करण्यात येणार असल्याचे आंदोलनाचे सचिव बाळासाहेब मालुंजकर यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
गटारी अमावस्येला विकणार दूध
By admin | Updated: August 14, 2015 01:22 IST