शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्रीय गृह मंत्रालयाने तामिळनाडूतील चेंगराचेंगरीचा अहवाल मागितला; अभिनेता विजयचीही चौकशी होणार
2
BSNL 4G स्पीड टेस्ट 2025: किती मिळतोय स्पीड? MBPS चा आकडा पहाल तर, म्हणाल...
3
आजचे राशीभविष्य, २८ सप्टेंबर २०२५: अचानक धनलाभ होईल; आनंददायी बातमी मिळेल
4
पाकिस्तानी लष्करानेच केली होती शस्त्रसंधीसाठी विनंती; भारताने सुनावले खडेबोल!
5
स्वतःच्या पायावर धोंडा, अमेरिकेच्या व्हिसा धोरणावरून भयकंप; पुढे काय अन् निर्णयामागे काय? जाणून घ्या
6
भारत विरुद्ध इंडिया; शहरी-ग्रामीण विषमतेचा अर्थ आणि परिणाम काय?
7
मी २०२९ सालापर्यंत महाराष्ट्रातच राहणार; दिल्लीला जाण्याची शक्यता फडणवीस यांनी फेटाळली!
8
कामाचा जास्त ताण घेता? हेल्थ कोण सांभाळणार? आतापासूनच घ्या 'या' गोष्टींची काळजी
9
तामिळनाडूत अभिनेता विजय यांच्या सभेत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा मृत्यू!
10
लेह हिंसाचार प्रकरण: वांगचूक जोधपूर तुरुंगात; पोलिसांकडून कसून चौकशी
11
आज पुन्हा युद्ध; आशिया चषक फायनलमध्ये भारत-पाक भिडणार!
12
टिकटॉक अमेरिकेत सुरूच राहणार, काय झाली डील?
13
सबकुछ मोहनलाल!'वानप्रस्थम्'मधील कथकली नर्तक ते 'दृश्यम'मधील सामान्य माणूस-अभिनयाचा हा आवाका कसा शक्य झाला?
14
बाबांचे पुस्तकप्रेम, आईची शिस्त अन् धैर्याची शिखरवारी! १३ वर्षांची धैर्या पोहोचली माउंट एलब्रुसवर
15
आधीच पुराने बेजार, त्यात आज पुन्हा 'मुसळधार'; मुंबई, ठाण्यात रेड अलर्ट
16
‘फुलराणी’ म्हणते, सध्या मी खेळणंच सोडून दिलंय..! सायना नेहवाल नेमकं काय म्हणाली?
17
‘बीएसएनएल’ची स्वदेशी ४जी सेवा कार्यान्वित, पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्घाटन; स्वयंपूर्णतेकडे वाटचाल
18
अमेरिकेत १६ राज्यांचे ट्रम्प प्रशासनाविरुद्ध खटले;  लिंगाधारित अभ्यासक्र, निधी रोखण्याचा सरकारचा इशारा
19
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
20
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय

एव्हरेस्ट सर करण्याची जिद्द बाळगणारी मधुरा दुधगावकर

By admin | Updated: May 8, 2014 13:53 IST

गातील सर्वात उंचीची शिखरे सर करण्याची परभणीच्या मधुरा गणेशराव दुधगावकर हिची महत्वाकांक्षा अभिमान वाटणारी अशीच आहे.

सतीश जोशी , परभणी

जगातील सात खंडातील सर्वात उंचीची असलेली शिखरे सर करण्याची परभणीच्या मधुरा गणेशराव दुधगावकर हिची महत्वाकांक्षा जिल्ह्यासाठी खरोखरंच अभिमान वाटणारी अशीच आहे. अनेक शिखरे सर केल्यानंतर एव्हरेस्टची तिची मोहीम नैसर्गिक आपत्तीमुळे अर्धवट राहिली तरी तिने पुढील प्रयत्नात हे शिखर गाठणारच, असा मनोदय लोकमतशी बोलताना व्यक्त केला. मधुरा ही परभणीचे खा.गणेशराव दुधगावकर आणि प्रा.संध्याताई दुधगावकर यांची कन्या. काहीतरी धाडसी कार्य करण्याचा तिचा स्वभाव. अमेरिकेत नोकरी करताना तिला ट्रॅकिंगची आवड निर्माण झाली. छोटे- मोठे शिखरे सर करताना जगातील मोठी शिखरे सर करण्याचा दृढ निश्चिय तिने केलाच नाही तर त्यासाठी परिश्रमही केले. २००५ पासून ती ट्रॅकिंग करीत असून १४ हजार फूट उंचीचे कॅलिफोर्निया येथील शास्ता हे शिखर सर केले. त्यानंतर जगातील सात खंडातील जी सर्वात उंच शिखरे आहेत, त्याकडे तिने लक्ष केंद्रित केले. २००७ मध्ये अर्जेनटिनातील २३ हजार फुट उंचीचे अ‍ॅक्वॉनगुवा हे शिखर सर करण्यासाठी मोहीम आखली. परंतु, १७ हजार फुट उंचीवर पोहोचल्यानंतर हीम वादळामुळे ही मोहीम अर्धवट सोडून परतावे लागले. २००८ मध्ये अ‍ॅस्ट्रोलियातील कौसियास्को हे ९ हजार फुट उंचीचे शिखर सर केले. २०१० मध्ये उत्तर अमेरिकेतील २० हजार २०० फुट उंचीचे मॅक्निले हे शिखर मधुराने सर केले. यानंतर २०११ मध्ये अफ्रिकेतील १९ हजार फुट उंचीचे केलिमांज्रो सर केले. एका पाठोपाठ एक अशी उंचीचे शिखरे सर करताना तिने आपली मोहीम आशिया खंडातील एव्हरेस्टकडे वळविली. २९ हजार २९ फूट उंचीचे हे शिखर खरोखरच कठीण गोष्ट होती. १८ एप्रिल १४ रोजी ती पहिल्या टप्प्यात १७ हजार फुटावरील उंचीपर्यंत पोहचली देखील. परंतु, हीम वर्षावामुळे जवळपास १६ शेर्पा यांचा अपघाती मृत्यू झाल्याने ट्रेकींग बंद केले. मधुरा आणि तिच्या साथीदारांनाही मोहीम थांबवावी लागली असली तरी महत्वकांक्षा अधिक पटीने वाढली आहे. एव्हरेस्ट सर करण्याचे मधुरा दुधगावकराचे स्वप्न आहे.