शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

४० हजाराचे बिल चिल्लरमध्ये भरुन रुग्णालयाला शिकवला धडा

By admin | Updated: November 11, 2016 13:37 IST

सध्या नोटांची प्रचंड मारामार असून, चलन तुटवडयामुळे प्रत्येकजण जमेल त्या मार्गाने सुट्टे पैसे मिळवण्याचा प्रयत्न करत आहे.

 ऑनलाइन लोकमत 

कोलकाता, दि. ११ - सध्या नोटांची प्रचंड मारामार असून, चलन तुटवडयामुळे प्रत्येकजण  जमेल त्या मार्गाने सुट्टे पैसे मिळवण्याचा प्रयत्न करत आहे. पश्चिम बंगालच्या अलीपोरमध्ये एका रुग्णाने चक्क ४० हजार रुपयांचे बिल चिल्लरमध्ये भरुन रुग्णालयातून डिस्चार्ज मिळवला. सुकांता छाऊले असे या रुग्णाचे नाव आहे.
 
टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार डेंग्युने आजारी असलेल्या सुकांताला न्यू अलीपोरच्या बीपी पोद्दार रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. बुधवारी रुग्णालयाने सुकांताच्या डिस्र्चार्जसाठी कुटुंबियांना ४० हजार रुपयांचे बिल जमा करण्यास  सांगितले. या कुटुंबाकडे ५०० आणि १ हजार रुपयाच्या नोटा असल्यामुळे बिल चुकवायचे कसे असा प्रश्न या कुटुंबियांसमोर होता. 
 
त्यांनी रुग्णालयाला जुन्या नोटा स्वीकारण्याची विनंती केली. पण रुग्णालयाने नकार दिला. त्यांनी चेकचा पर्यायही दिला पण तो ही रुग्णालयाने मान्य केला नाही. अखेर छाऊले कुटुंबाने व्हॉटसअॅपवरुन नातेवाईक, मित्रपरिवाराला मदतीचे आवाहन केले. या आवाहनाला तुफान प्रतिसाद मिळाला आणि ४० हजार रुपयांची नाणी जमा झाली. 
 
त्यांनी ४० हजाराची ही नाणी एका पिशवीत जमा केली व ती बॅग घेऊन रुग्णालयात आले. नाण्यांची थैली बघून रुग्णालयाला धक्का बसला. त्यांनी चिल्लरमध्ये बिल स्वीकारण्यासही नकार दिला. त्यावेळी छाऊले कुटुंबाने पोलिसात तक्रार दाखल करण्याची धमकी दिली. त्यानंतर नरमलेल्या रुग्णालय प्रशसनाने ती नाण्यांची थैली स्वीकारली. सहा स्टाफ सदस्यांनी तब्बल तीन तास बसून ही नाणी मोजली. दुपारी तीन वाजता सुकांताला रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला.