शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

उशिरा लग्न लावल्यास ५ हजारांचा दंड!

By admin | Updated: January 12, 2016 02:14 IST

गेल्या काही दिवसांपासून लग्नाचा मुहूर्त चुकवण्याची प्रथाच पडली आहे. यामुळे वेळेवर लग्नासाठी पोहोचणाऱ्या वऱ्हाड्यांसह नातेवाईक आणि मित्र मंडळींना नाहक मनस्ताप सहन करावा लागतो.

- अनिल गवई, खामगाव (जि.बुलडाणा)

गेल्या काही दिवसांपासून लग्नाचा मुहूर्त चुकवण्याची प्रथाच पडली आहे. यामुळे वेळेवर लग्नासाठी पोहोचणाऱ्या वऱ्हाड्यांसह नातेवाईक आणि मित्र मंडळींना नाहक मनस्ताप सहन करावा लागतो. त्यामुळे उशिरा लग्न लावणाऱ्या वधू आणि वराकडील मंडळींना ५ हजार रुपयांचा दंड ठोठावण्याचा एकमुखी ठराव बुलडाणा जिल्हा भावसार समाज मंडळाने घेतला आहे.वेळेवर लग्न लावण्यासाठी एक आदर्श संहिताच महाराष्ट्र भावसार समाजाशी संलग्नित असलेल्या बुलडाणा जिल्हा भावसार समाज मंडळाने तयार केली आहे. रविवारी त्याबाबतचे विविध ठराव संमत करून त्यांची अंमलबजावणीदेखील सुरू केली आहे. उशिरा लग्न लावणाऱ्या वधू आणि वराकडील मंडळींना प्रत्येकी अडीच हजार रुपयांचा दंड भावसार समाज मंडळ वसूल करणार आहे. आदर्श आचार संहिता तयार करताना पर्यावरण रक्षणाचा उद्देश डोळ्यांसमोर ठेवून विवाह सोहळा, व्रतवैकल्य, वाढदिवस, दशक्रिया विधी यांसारख्या सामाजिक उपक्रमामध्ये प्लास्टीक पत्रावळ्या, द्रोणसुद्धा न वापरण्याचा ठराव या वेळी घेण्यात आला. त्यांचा वापर केल्यास संबंधितांना २१०० रुपयांचा दंड ठोठावण्यात येणार आहे.लग्न लावण्यास उशीर होत असल्यामुळे अनेक ठिकाणी पाहुणे मंडळींना मनस्ताप सहन करावा लागतो. त्यामुळे भावसार समाजाने ‘समय के साथ चलो’ अभियान राबविण्याचा निर्णय घेतला आहे.- किशोर जुनगडे, अध्यक्ष, बुलडाणा जिल्हा भावसार समाज मंडळपर्यावरण रक्षण आणि समाजाच्या हितासाठी विविध समाजोपयोगी ठराव पारित करण्यात आले. या ठरावाच्या काटेकोर अंमलबजावणीसाठी आपण महाराष्ट्रभर दौरे करणार आहोत.- डॉ. विजय जिराफे, अध्यक्ष, विदर्भ भावसार समाज मंडळ