शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तेलाच्या किमती कमी ठेवा, मी बघतोय!" इराण-इस्रायल युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांचं मोठं विधान
2
ठरले! महादेव बाबर NCPमध्ये करणार प्रवेश; DCM अजित पवार राहणार उपस्थित, पुण्यात ताकद वाढणार
3
ENG vs IND: KL राहुल-पंतच्या सेंच्युरीनंतर जड्डूची उपयुक्त खेळी! इंग्लंडसमोर ३७१ धावांचे टार्गेट
4
इस्रायलचा इराणवर मोठा हल्ला, ५० हून अधिक लढाऊ विमानांचा कहर; महत्त्वाच्या लष्करी तळांवर तुफान बॉम्बिंग
5
"२०२२ मध्ये केवळ वादळ होतं, २०२७ मध्ये....", पोटनिवडणुकीच्या निकालानं केजरीवाल खूश, केली मोठी भविष्यवाणी
6
खामेनेई पळून जाण्याच्या तयारीत! इराणच्या माजी युवराजांचा दावा, 'सुप्रीम लीडर'बद्दल काय म्हणाले?
7
"तमीज से खेलने के चक्कर में..." कडक खेळी शिवाय पंतची 'मन की बात' चर्चेत (VIDEO)
8
राजाच्या पैशानेच बनली त्याच्या मृत्यूची योजना! लग्नाआधीच सुरू केलेलं नवं खातं, सोनमनं तेच पैसे वापरले अन्... 
9
रिषभ पंतला तोड नाय! सेंच्युरीसह रचला इतिहास; स्टेडियम स्टँडमधून गावसकरांचा 'कोलांटी उडी' मार असा इशारा
10
इराणने अशी कोणती मिसाईल डागली? इस्रायलमध्ये ना अलर्ट आला ना सायरन वाजला; हायफावर कोसळली...
11
२८ जुलैचा दावा खरा होणार? तिसरे महायुद्ध अटळ? बाबा वेंगा-नास्त्रेदमस यांची मोठी भविष्यवाणी
12
"वाटलं भारताने अण्वस्त्र हल्लाच केला, पाकिस्तानकडे फक्त...', नेमकं काय म्हणाले बिलावल भुट्टो
13
KL राहुलनं शतकी खेळीसह साधला विक्रमी डाव! लिटल मास्टर गावसकरांसह द्रविडलाही टाकले मागे
14
'मी राज्यसभेवर जाणार नाही...', स्वतः अरविंद केजरीवालांनी लावला चर्चांना पूर्णविराम
15
इराण-इस्त्रायल युद्ध पेटले! ४० मिनिटे इस्रायलवर क्षेपणास्त्रांचा मारा, थरकाप उडवणारे व्हिडिओ व्हायरल!
16
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू
17
आषाढी वारीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सहभागी होणार; दिवसभर दिंडीसोबत चालणार
18
“विकासासाठीचा प्रत्येक रुपया सर्वसामान्यांपर्यंत पोहोचला पाहिजे”: DCM एकनाथ शिंदे
19
तिसऱ्या महायुद्धाला तोंड फुटण्याची भीती...! इराण इस्रायल युद्धात आणखी एका देशाची उडी; कुणाला देणार साथ?
20
“भास्कर जाधव नौटंकी, जनताच संन्यास देणार, तो काही एवढा मोठा माणूस नाही”; कुणी केली टीका?

जाणून घ्या एकदिवसीय सामन्यात कोणत्या संघाच्या नावे किती शतकं आहेत

By admin | Updated: August 18, 2016 16:34 IST

एकदिवसीय क्रिकेटच्या इतिहासात केवळ आठच संघ असे आहेत. ज्यांच्या फलंदाजांनी १०० किंव्हा त्यापेक्षा जास्त शतकं ठोकण्याची करामत केली आहे.

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. 18 - एकदिवसीय क्रिकेटच्या इतिहासात आठ संघातील फंलदाजांनी 1,172 शतकं केली आहेत. या  देशांच्या फलंदाजांनी १०० किंव्हा त्यापेक्षा जास्त शतकं ठोकण्याची करामत केली आहे. सर्वोकृष्ट फलंदाज म्हणून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा आणि शतकांचं शतक करण्याच्या भीमपराक्रम सचिन तेंडुलकरच्या नावावर आहे. अशा पद्धतीच्या अनेक रेकॉर्डस् बद्दल आपण ऐकलं, वाचलं असेलचं. परंतु कोणत्या देशाच्या किती फलंदाजांनी एकूण किती शतकं केली याचा विचार केल्यास अनेक आश्चर्यकारक आकडेवारी मिळते.कोणत्या देशांनी किती शतकं केली आहेत  याचीच माहिती आम्ही तुम्हाला देत आहोत. तर चला जाणून घेऊयात कोणत्या देशाच्या नावे किती शतके आहेत. 
 
८. न्यूझीलंड (११० शतकं )
१९७१ साली पहिला एकदिवसीय सामना खेळणारा न्यूझीलंड संघ सर्वात जास्त शतकं बनवणाऱ्या संघांमध्ये आठव्या क्रमांकावर येते. १९७१ पासून आत्तापर्यंत न्यूझीलंडने एकूण ७०३ एकदिवसीय सामने खेळले आहेत ज्यात या संघाच्या फलंदाजांनी एकदिवसीय सामन्यात एकूण ११० शतकं लगावली आहेत. नाथन एस्टल आणि रॉस टेलर या फलंदाजांनी सर्वाधिक शतकं न्यूझीलंडसाठी लगावली आहेत. या दोन फलंदाजांनी अनुक्रमे १६ आणि १५ शतकं केली आहेत. 
 
७. इंग्लंड (१३८ शतकं ) 
साहेबाचा खेळ अशी ओळख असलेल्या क्रिकेटमध्ये फलंदाजांनी लागवलेल्या शतकांचा विचार करता इंग्लंडचा क्रमांक सातवा लागतो. इंग्लंड च्या फलंदाजांनी ६६९ सामन्यांत एकूण १३८ शतकं लागवलेली आहेत. इंग्लंडकडून सर्वाधिक शतकं मान मार्कस ट्रेसकोथिकने केली आहेत. त्याने १२३ सामन्यांत इंग्लंडसाठी एकूण १२ शतकं ठोकली आहेत.
 
६. दक्षिण आफ्रिका (१५८ शतकं )
एकदिवसीय क्रिकेटमध्ये उशिरा पदार्पण करणारा दक्षिण आफ्रिका संघ फलंदाजांच्या शतकांत मात्र त्यांच्याही आधी आलेल्या इंग्लंड आणि न्युझीलँडला मागे टाकतो. दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांनी एकूण १५८ शतकं केली आहेत. एबी डिव्हिलियसने दक्षिण आफ्रिकेकडून सर्वाधिक म्हणजेच २४ शतकं लगावलेली आहेत. तर त्यापाठोपाठ हाशिम आमला (२३ शतकं ) आणि हर्शल गिब्स (२१शतकं ) हे अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर आहेत.
 
५. श्रीलंका (१६० शतकं )
कोणत्या देशाच्या किती फलंदाजांनी एकूण किती शतकं केली याचा अभ्यास केल्यास श्रीलंका आणि वेस्ट इंडिज या दोन संघाच्या फलंदाजांनी सारखीच म्हणजेच १६० शतक लागवल्याचं लक्षात येत. परंतु ही शतकं श्रीलंकेने वेस्ट इंडिजच्या तुलनेत अधिक सामन्यात केली असल्यामुळे श्रीलंकेचा क्रमांक पाचवा येतो. सनथ जयसूर्या (२८ शतकं ), कुमार संगकारा (२५ शतकं ) आणि तिलकरत्ने दिलशान (२२ शतकं ) या तीन फलंदाजांनी २० पॆसे अधिक शतकं श्रीलंकेकडून खेळताना लगावली आहेत.
 
४. वेस्ट इंडिज (१६० शतकं )
वेस्ट इंडिजच्या फलंदाजांनी श्रीलंकेच्या तुलनेत कमी सामन्यात १६० शतकं केली असल्यामुळे श्रीलंकेचा क्रमांक पाचवा येतो. वेस्ट इंडिजकडून खेळताना क्रिस गेल (२२ शतकं ), ब्रायन लारा (१९ शतकं ) आणि डेसमंड हेस (१७ शतकं ) यांनी सर्वात जास्त शतकं केली आहेत.
 
३. पाकिस्तान (१७२ शतकं )
पाकिस्तानच्या फलंदाजांनी ८३७ एकदिवसीय सामन्यांत एकूण १७२ शतकं लागवलेली आहेत. पाकिस्तानकडून सर्वाधिक शतकं सईद अन्वरने केली आहेत त्याने एकूण २० शतकं पाकिस्तानसाठी लगावली आहेत.
 
२. ऑस्ट्रेलिया (१९४ शतकं )
ऑस्ट्रेलियाने आत्तापर्यंत एकूण ८७७ एकदिवसीय सामने खेळले आहेत ज्यात त्यांच्या फलंदाजांनी एकूण १९४ शतकं ठोकली आहेत. यात सर्वाधिक शतके रिकी पॉन्टिंगने (२९ शतकं ) केली असून त्या खालोखाल मार्क वॉ (१८ शतकं ) चा दुसरा क्रमांक लागतो.
 
१. भारत (२४० शतकं )
एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतकं ठोकणाऱ्या संघामध्ये भारताचा प्रथम क्रमांक लागतो. भारतीय क्रिकेट संघ हा जगातील एकमेव असा संघ आहे कि याच्या फलंदाजांनी एकदिवसीय क्रिकेटमध्ये २०० पेक्षा अधिक शतकं ठोकली आहेत. भारतीय फलंदाजांनी आजपर्यंत एकूण ८७७ एकदिवसीय सामन्यांमध्ये २४० शतकं लगावली आहेत. भारतातर्फे सर्वाधिक शतकं बनवली असल्याच्या यादीत सचिन तेंडुलकर (४९ शतकं), विराट कोहली (२५ शतकं ) आणि सौरव गांगुली (२२शतकं ) या खेळाडूचा समावेश आहे. असं असलं तरी विराट चा चालू फॉर्म पाहता तो भारतीय संघाला शतकं फटकावण्याच्या या यादीत नवीन उंचीवर नेऊन ठेवेल यात शंकाच नाही.