शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

पतीने मांस खाल्ल्याने पत्नीचा घटस्फोसाठी अर्ज

By admin | Updated: April 22, 2017 10:54 IST

23 वर्षीय महिलेने आपला पती मांसाहार करत असल्याने घटस्फोटाची मागणी केली आहे

ऑनलाइन लोकमत
अहमदाबाद, दि. 22 - 23 वर्षीय महिलेने आपला पती मांसाहार करत असल्याने घटस्फोटाची मागणी केली आहे. आपल्या पतीने लग्नाआधी मांसाहार न करण्याचं दिलेलं वचन तोडल्याचा आरोप करत महिलेने घटस्फोटासाठी अर्ज केला आहे. सोला येथे राहणा-या रिमा दोशी यांनी आपला पती गेल्या पाच वर्षांपासून आपल्यावर अत्याचार करत असल्याची तक्रार पोलिसांत केली आहे. रिमा दोशी जैन धर्मातील असून पुर्ण शाकाहारी आहे. आपल्या पतीने जेवणाच्या सवयींमध्ये बदल न केल्याने अखेर रिमा यांनी हे पाऊल उचललं आहे. 
 
सहा वर्षापुर्वी रिमा आणि करण चंदेला यांचं प्रेम प्रकरण सुरु झालं होतं. करण सोला येथील रिमाच्या घरासमोर कॉम्प्यूटर ऑफिरसमध्ये काम करायचा. मूळचा बिहारचा असणारा करण मांसाहारी होता. आपल्या समाजात मांसाहारावर बंदी असल्याने रिमाला हे मंजूर नव्हतं. जेव्हा रिमाने करणच्या मांसाहाराचा विरोध केला, तेव्हा त्यानेही प्रेमाखातर मांसाहार सोडण्याचं वचन दिलं. यानंतर रिमाने आपल्या आई- वडिलांना करणबद्दल सांगितलं. सुरुवातीला विरोध करणारे आई, वडिलही मुलीच्या हट्टापुढे झुकले आणि लग्नासाठी तयार झाले. 
 
रिमाने तक्रारीत सांगितलं आहे की, करणने कधी मुलांसाठीही पैसे दिले नाहीत. ऑफिसच्या कामानिमित्र बाहेर जाण्याचं कारण सांगून तो आपल्या मित्रांसोबत पिकनिकला जाऊन दारु प्यायचा आणि मांसाहारही करत असे", असं रिमाने सांगितलं आहे. 
 
"आपण कधीही रिमाच्या समोर बसून मांस खाल्लेलं नाही, किंवा मी कधीच तिला मांसाहार करण्याच्या ठिकाणी घेऊन गेलेलो नाही", अशी बाजू करणने मांडली आहे. "जेव्हा कधी मी शहराबाहेर जात असे तेव्हाच मांसाहार आणि दारुचं सेवन करत असे. आणि त्यादिवशी घरी जाऊ नये असाच प्रयत्न असायचा", असंही करणने सांगितलं आहे. 
 
पोलिसांनी दोघांना आपापसात चर्चा करुन प्रकरण मिटवण्याचा सल्ला दिला. तसंच आपल्या मुलासोबत वेळ घालवण्याचाही उपाय सांगितला. पण रिमा यासाठी तयार नसून आपल्या पतीच्या घरी जाणार नसल्यावर ठाम आहे. अखेर दोघांनी घटस्फोटासाठी अर्ज केला आहे.