बीजिंग : टीव्हीवरील एका लाइव्ह शोमध्ये ती अॅलोविराचे (कोरफड) महत्त्व सांगत होती. यावर चर्चाही सुरू होती. कोरफडीचे किती फायदे आहेत हे सांगण्यासाठी चीनमधील या २६ वर्षीय तरुणीने व्लागर झांग हिने ही कोरफड खाऊ न दाखविली, पण तिला हे ठाऊक नव्हते की, तिने कोरफड समजून दुसरीच विषारी वनस्पती खाल्ली आहे. कोरफडीसारखीच दिसणारी ही वनस्पती एगेव अमेरिकाना होती. त्यानंतर काही वेळातच तिला अस्वस्थ वाटू लागले. प्रकृती बिघडली आणि तिला हॉस्पिटलमध्ये दाखल करावे लागले. लाइव्ह शोमध्ये विषारी वनस्पती खाल्ल्याचा हा व्हिडीओ सध्या व्हायरल झाला आहे.
टीव्हीच्या लाइव्ह शोमधून ती पोहोचली हॉस्पिटलमध्ये
By admin | Updated: July 6, 2017 02:04 IST